हल्ली सून्न झालेल्या शहरांची भीती नाही वाटत मला की,नाही वाटत विशेष काही त्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या भोंग्यांचे.जे उभे आयुष्य वेळेवर चालायला शिकवत होते...
का तर...आज त्यांनी सुद्धा वेळ सोडली आहे,ते ही बंद पडले आहे आठवत भूतकाळातील आठवणींना.भविष्यकाळातील भेसूर जगण्याला,वर्तमान काळातील जगतांनी मरण यातना सोसण्याच्या प्रवास बघत विचार मग्न होत...
ज्या शहरांकडे बघून जगण्यासाठी ऐन उमेदीचे स्वप्न बघितले होते,आज तिथेच मरण दिसायला लागले.तेव्हाच कुठेतरी आपले शहर आपल्याला परके भासू लागले होते...
शहरे सूंनसांन झाली एम.आय.डी.सी ची हेळणा सुरू झाली,आणी जगण्याला आशेचे पंख देणारे यंत्र माणसाच्या हव्यासापोटी मरणाच्या या शर्यतीत जगते राहण्यासाठी धडाधड बंद पडु लागलीत...
आता सवय झाली ही शांत पडलेली शहर
पुन्हा कधी चालू होतील माहीत नाही.पण आतली भूक स्वस्थ बसू देत नाहीना,तिचे काय तिच्यासाठी भटकावे लागते...
थोडे थोडे मरण्यापेक्षा असे झटक्यात आलेले मरण सोपे वाटले की,मग नाही भासत कुठली भीती.भूक लागली की मग फक्त भाकर दिसते....
अन्न,वस्त्र,निवारा मूलभूत गरजा नावाला राहतात फक्त अन्न भेटलं की खूप होते,त्यासाठीच ही सगळी भटकंती असते.
म्हणुन हल्ली बंद पडलेल्या शहरांची भीती नाही वाटत मला...रस्त्याने भर उन्हात जेव्हा भाकरीसाठी पोट विसावा शोधू लागतोना त्याची भीती वाटू लागते...
अलीकडे प्रवाहा सोबतीने वाहने विसरलो आहे आपण,कारण अपेक्षा वाढल्या आहे.फरक काही पडत नाही धनी लोकांना,फक्त हा मजूर वर्ग काही प्रमाणात मरतो...
शेवटी काय आहे सर्व स्थिर झाले की,त्यांची भूक पुन्हा त्यांना शहराला घेऊन येईल...पण तेव्हा अवस्था वेगळी असेल,कंपनीचा ड्रेस आणी दीड किलोचा सेफ्टी बूट भेटल,त्यांना कामगार म्हणून पुन्हा रुजू होण्यासाठी कंपनीत.पण त्याची मेलेली भूक पुन्हा जागी होणार नाही त्याचं काय...
तेव्हा त्याला चिंता उद्याची असेल,कारण तो पण शिकला असेल आता जगण्यातला व्यवहारीपणा....आठवल त्याला भाकरीसाठी केलेली वणवण जेव्हा त्याला आपलीच गमवलेली माणसे आठवतील....
#ओसाड_पडलेल्या_शहरांची_भिती_नाही_वाटत_मला_जेव्हा_रस्ते_भाकरीसाठी_सुंनसान_होतात...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा