#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_क्षेत्र...
#भाग_एक.
महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर नव्याने ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,काही प्रकल्प काही कारणास्तव येऊ शकली नाहीत.
तो भाग वेगळा...
या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला...
औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि शेंद्रा (एमआयडीसी) ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या.
औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे,परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...
औरंगाबाद शहराचा कचरा व्यवस्थापन हा प्रश्न नियमित चर्चेत राहिलेला आहे,त्यानंतर पूर्ण जगावर आलेले कोरोनाचे सावट यामुळे औद्योगिक वसाहती मधील बरेच नवीन प्रकल्प उभे राहतांनाच संपुष्टात आले.ज्या कंपन्यांचा बर्यापैकी जम बसला आहे अश्या कंपन्या याकाळात डगमगाईस आल्या,कंपन्यांच्या व्यवस्थापनावर कामावर यांचा थेट परिणाम दिसून आला...
तीन शिफ्टमध्ये चालणारे बरेचसे काम या काळात एका शिफ्टवर चालू लागले आहे,कारण या काळात ऑटोमोबाईल विश्वात कुठलीही उलाढाल झालेली नाही त्यामुळे कंपन्यांतील बरेच मजूर कायमचे बंद करण्यात आले आहे.
कारणास्तव शहरात बेरोजगारी निर्माण झाल्यामुळे तरुण वर्ग हताश झालेला आहे,लाॅकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे बरेच व्यवसाय पुर्ववत सुरू झाले आहे.परंतु या संकटातून बाहेर पडण्यासाठी लागणारा बराच कालावधी सर्वच कंपन्यांना द्यावा लागणार आहे,त्यामुळे पुढील काही काळ औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे....
औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असणाय्रा कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो...
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा