#HashtagMe...
कधीतरी काळोख आपलासा वाटतो,कॅनव्हासवर अधुरे राहीलेले चित्र पूर्ण झालेल्या चित्रापेक्षा आवडू लागते...गवंड्याकडून प्रोपर सोयीची करून घेतलेली माझी बेडरूम मला आवडत नाही,फर्निचरवाल्याकडून कित्येक डिझाइन बघुन सलेक्ट केलेलं काचेच बुकशेल्फ नकोसं वाटतं त्यातील कोऱ्या करकरीत एकही पान न दुमडलेल्या कित्येक कादंबऱ्या मला नकोश्या वाटतात....
आपल्या सभोवताली असलेल्या या रोजच्या वापरात,हाताळण्यात येणाऱ्या वस्तूंचे किती झालो असतो नाही का आपण..?
कधीतरी त्याही आपल्याला जेव्हा नकोश्या वाटू लागतात तेव्हा मात्र समजून जायचे आपल्या आत असलेलं नैराश्य हे वाढत आहे...
एकवेळ असते आपण आपल्याच माणसांना इग्नोर करू लागतो कारण काहीच नसते एकांत,आपली हवी असणारी उत्तरे जी इतरांकडे नसतात.मनाची लहान बाळासारखी खोटी समज घालायची अन् अपेक्षित उत्तर भेटले आहे आपल्याला आपल्याकडूनच म्हणून तितक्यावेळ डोळ्यातील पाण्याला सावरत बसायचं...
समाधान झालेलं नसते खूप अती झालंय असे वाटू लागले की,ही आपली माणसे आपोआप आपण सोडून देतो.आपली बेडरूम आपल्याला प्रिय वाटायला लागते,बुकशेल्फ मधील कादंबऱ्या वाचून संपू लागतात पण हे काही वेळेपूर्ते मर्यादित असते...
मग एकवेळ येती हे सर्व नकोसे वाटते....
पुन्हा तेच सांगतो,
मग कधीतरी काळोख आपलासा वाटतो,कॅनव्हासवर अधुरे राहीलेले चित्र पूर्ण झालेल्या चित्रापेक्षा आवडू लागते.गवंड्याकडून प्रोपर सोयीची करून घेतलेली माझी बेडरूम मला आवडत नाही,फर्निचर वाल्याकडून कित्येक डिझाइन बघुन सलेक्ट केलेलं काचेच बुकशेल्फ नकोस वाटतं...
कादंबऱ्या वाचून संपलेल्या असतात मग त्यांचा प्रश्न नाही,राहिलं पाने दुमडणे ते मला कधी आवडत नाही...
कोऱ्या मनासारखे कोरी,काळी अक्षरं असलेली पाने छान वाटतात....
हे सर्व झालं की मग काळोख आपलासा वाटतो,अडगळीतली जुनी खोली माझी वाटते.जुन्या लॉक तुटलेल्या कपाटात धूळ खात पडलेली कादंबरी,विविध पुस्तके,पेपरची रद्दी मला वाचायला आवडु लागते...तासंतास अडगळीतील खोलीत निघू लागतो ती आता आपलीशी वाटते,फिरणारा धुळीने माखलेला फ्यान यात सर्वात जवळचा असतो त्याचा आवाज रात्री नसला की हल्ली झोप येत नाही....
भाई... माणसे नाही होत सवयीची लवकर इतकी हे सर्व झाली आहेत.
म्हणूनच...तो कॅनव्हासवर रंगवलेला अर्धवट चेहरा मी तसाच सोडून दिला आहे.कारण भाई हल्ली माणसे नाही आवडत मला एकांत,एकटेपण,हवी असणारी उत्तरे भेटतात मला इथे या वस्तूंमध्ये...
कधीतरी या वस्तुंशी बोलू लागलोना मी,तर मी वेडा झालेलो नसेल तर वस्तू माझ्यासाठी माणसांपेक्षा प्रिय झाली असेल....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा