#Backspace.
कित्येक बॅकस्पेस घेऊन खूप प्रयत्नांनी काहीतरी लिहले आहे खूप वेळा पुन्हा पुन्हा आपणच आपले लिहलेले वाचत राहावे,एकवेळ अशी येते लिहलेले निरर्थक,चुकीचे आहे असे वाटते.
मग पुन्हा तेच रिपीट-रिपीट लिहत राहायचं बॅकस्पेस देत राहायचे...
विचारांचे गणित जेव्हा जुळत नाहीना तेव्हा ही अवस्था होते,सोप्पे गणिते अवघड होऊन बसतात.स्वप्न सत्यात उत्रवणे जितके अवघड तितकेच विचारांचे गणित जुळवणे आहे.
खूप दिवस झाले ऐकलंय तू कॅनव्हासवर काही मुक्तपणे उधळण केली नाहीये,मग वाट कसली बघत आहेस यार उधळून द्यायचे रंग मुक्तपणे,उधळण करून साकारले तर माझी तू विचारी कॅप्चर केलेली छबी त्यावर साकारली जाईल.
नाहीतर...
मी ऐकलंय ब्लॅकवर व्हाईट छान दिसते,फक्त त्याला किती पसरवायचं हे आपल्याला उमगले पाहिजे मग काळोखातसुद्धा एखादा पांढराशुभ्र तुझा मुखवटा कॅनव्हासवर साकारला जाईल नाही का..?
एक सांगू ऐकणार असेल तर...
कॅनव्हास दुसरी संधी देतो,पर्याय देतो ज्यात काहीतरी सुंदर साकारले जाते...पण ना..! बॅकस्पेस देऊन केलेलं लेखन फक्त प्रश्न देतं त्याला उत्तरे नसतात,मग पुन्हा पुन्हा तेच वाचायचं तिथच चुकायच,तडफडत राहायचं स्वप्नाला सत्यात उतरवणारे गणिते सोडवत राहायची,सोबतीला न सुटलेली विचारांची गणितं असतातच...
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा