मुख्य सामग्रीवर वगळा

World Space Week...


World Space Week...

लहानपणी आपला वावर हा नेहमी दोन विश्वात असतो...
एक कल्पनेतील विश्व तर दुसरे प्रत्यक्षात जगत असलेले विश्व,यातील कल्पनेतील विश्व म्हणजे जिथे कुठल्याही मर्यादा नसतात आपल्या मनाला वाटल तिथं आपण फिरून येतो.
सेकंदात अवकाशात फिरून येणं असो,एखाद्या दुसऱ्या गृहावर जीवन असेल,ते कसे असेल याची कल्पना करून तेथेही वास्तव्य करून येऊ शकतो,तर कधी हडप्पा संस्कृती,जीवनशैली कशी असेल त्यांची घरे प्रत्यक्षात त्यांच्या काळात जावून बघण्याची सुद्धा कल्पना आपण करतो.एकूण हे कल्पनेतील विश्व खूप मोठ्ठं ज्याला सीमा नाही असे आहे...

मग तुम्ही म्हणाल याचा फक्त लहानपणाशीच का संबंध जोडला..?
मोठी व्यक्ती नाही करू शकत का ही कल्पना..?
तर ती ही करू शकते पण,लहानपणी हे जग फारवेळ सोबत असते,त्याच्या प्रती अनेक प्रश्न आपल्याला आपण पाडून घेत असतो अन् त्याचेच उत्तर स्वतः आपण मिळवून घेत असतो.त्यामुळे कुठेतरी लहानपणीच हे कल्पनेतील विश्व कुठेतरी खूप मोठे भव्य असे वाटते,जितके आपण मोठे झाल्यावर या विश्वात रमत नाही.कारण हे फक्त कल्पनेपूर्ते मर्यादित असते असा आपला भाबडा समज असतो,मग कधीतरी योग्यही वाटते तर कधी अयोग्य...

योग्य का वाटते..?
लहानपणी माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर माझा कल्पनेतील विश्व यात आवडता विषय कुठला असेल तर तो...अवकाश संशोधन टीव्ही आणि वर्तमान पत्रात सहज उपलब्ध होणारे या विषयाशी निगडित लेख मी न चुकता वाचत असे,टीव्हीवर ते दूरदर्शनवरील अवकाश संशोधन या विषयावर असलेले कार्यक्रम बघत असत त्यामुळे नेहमीच एक आकर्षण निर्माण झालेले होते...

अवकाश संशोधन,गृह,अवकाशातील असंख्य तारे,रॉकेट,यान,सॅटलाईट या विषयाप्रती पडलेले असंख्य प्रश्न अन् भविष्यात अवकाशात संशोधन करण्यासाठी आपण स्वतः जाण्याचे कल्पनेतील स्वप्न,ते प्रत्यक्षात उतरते का माहित नाही पण आम्ही कल्पनेत हा सर्व प्रवास केलेला आहे...
तो आठवला की आजही आपण लहानपणी किती सीमा पार करून विचार केले याची जाणीव होते,पण या विषयी असलेली आवड आणि पडलेली असंख्य प्रश्न यांना उत्तरे कसे मिळतील यासाठी नेहमीच मी धडपड करत असे...

ज्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर,इंटरनेट उपलब्ध झाले त्यावेळी मी काय बघावे तर अवकाश संशोधन वरील असंख्य व्हिडिओज त्यावेळी सर्च केले.असे वाटले की,पूर्ण अवकाश तेथील सेकंदाला होणाऱ्या लाखो हालचाली आपण आपल्या हातात कंट्रोल केलेल्या असाव्या हा अनुभव कायम आठवणीत असलेला...

पुढे कितीवेळा ठरवून अवकाशात संशोधन करण्यासाठी माझे मन मला कल्पनेत दुसऱ्या गृहावर घेऊनही गेले,ज्या अशक्य गोष्टी आहे त्या मी शक्यही केल्या कारण यात कल्पनेची जोड कायम होती... कीत्येकवेळा वाटायचे परग्रहावरून एखादी गोणी भरून दगडे घेऊन यावे आणि त्याच्यावर संशोधन करत रहावे,पण ही कल्पना इतर कल्पनेपेक्षा जास्तीच भन्नाट होती सो तो प्रयोग टाळला आम्ही सध्यातरी...

कितीही काही असो हे हास्यास्पद वाटत असले तरी मला वाटते अवकाश संशोधन या विषयात पुढील अनेक विषयांवर संशोधन करताना अनेक कल्पना केल्या जातात.नेमका होणारा फायदा,नुकसान याचाही विचार संशोधक कल्पनेतून करत असतात अन त्यानुसार अनेक आलेख पुढे आखलेले असतात.बऱ्याच वेळेला संशोधन हे वास्तव आणि केलेली कल्पना यांना जोड देऊन केले जात असेल असेही मला वाटते,यात खरे काय खोटे काय हे सांगू शकत नाही...

कारण इतका सहजासहजी आपले काही मते या विषयावर व्यक्त करणे योग्य नाही,कारण हा विषय पूर्ण जगासाठी,अवकाश संशोधन करणाऱ्या संशोधकासाठी महत्त्वाचा आहे,असतो...

आज अवकाशात होणारे संशोधन,अनेक असलेले प्रश्न यांना नासा,इस्रो सारख्या अनेक संस्था ज्या जगभरात कार्यरत आहे त्या आपल्याला एका क्लिकवर कित्येक माहिती, प्रश्नांची उत्तरे आपल्याला उपलबध करून देत असतात...
अवघे विश्व आपण घरात एका छताखाली बसून बघु शकतो,काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानात जगाने केलेली प्रगती बघता पुढील काही काळात अवकाश संशोधनाच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना,कल्पना जगभरात आखल्या गेल्या यांना प्रत्येक्षात यश मिळेल आणि लवकरच मानव अवकाश संशोधनातही आपला दबदबा अवघ्या विश्र्वापार कायम करेल इतकेच वाटते....

आज हे इतके सर्व लिहण्याचे कारण की,गेले काही दिवस
जागतिक अंतराळ सप्ताह दरवर्षी जगभर ४ ते १० ऑक्टोबरच्या  दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week)साजरा केला जात आहे... 

Written by,
 Bharat Sonwane...

"या वर्षीचा हा सप्ताह आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या कृत्रिम उपग्रह या विषयाला समर्पित आहे.जगातल्या कोणत्याही भागातील व्यक्तीशी आपण क्षणात संपर्क साधू शकतो.वेगवेगळी माहिती अगदी एका क्लिक वर आपल्या समोर येते.नैसर्गिक आपत्ती येण्याआधीच सूचना मिळून आपल्याला सतर्क राहता येते.हि सगळी पृथ्वी भोवती फिरणाऱ्या उपग्रहांची देणगी.आकाशवाणी,दूरदर्शन, दूरध्वनी,आंतरजाल,हवामानाचा अंदाज ,संरक्षण ,अभ्यास,जीपीएस अशा विविध कारणांसाठी उपग्रहांचा उपयोग होतो.
जगभरातल्या अनेक देशातील अवकाश संशोधन संस्था,खगोलीय संस्था,हौशी मंडळे,शाळा,महाविद्यालये या विषयाला अनुसरून वेगवेगळे उपक्रम राबवतात.त्यामुळे या विषयावर लिहायचा प्रयत्न..."
Written by,
Vinay Joshi...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...