मुख्य सामग्रीवर वगळा

Early Morning...


साधारण साडेपाचची ठरलेली वेळ नेहमीप्रमाणे ऊन असो,पाऊस असो, वारा,थंडी असो पण ही वेळ कधी चुकायची नाही वृत्तपत्र विक्रेत्याला ती कधी चुकतही नाहीच.मुळात या वृत्तपत्र मीडियाशी जोडून असलेले सर्वच निवांत झोप फार कमी घेतात प्रेसवाले सर्व मान्यवर,मित्र परिवार रात्रभर पेपर छापून त्या गरमा गरम पेपरच्या पार्सलला सर्व जिल्ह्यात वितरित करतो हे,वितरित करण्याचं काम अवघ्या चार ते पाच तासात पूर्ण जिल्ह्यात होत असते... 

तिथून पुढे जबाबदारी असते ती मग घरोघरी सायकलवर,गाडीवर,स्टॉलवर पेपर विकणाऱ्याची आपल्या वाचकाच्या हातात सकाळच्या गरम-गरम चहासोबत वृत्तपत्र त्याला कसे मिळेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेऊन पहाटेचे हे काम सुरू होते...
साडेपाचची वेळ स्वेटर,शूज घालून सायकलला टांग मारायची दोन किलोमीटर नाक्यावर पेपरची काळी-पिवळी गाडी पार्सल घेऊन पावणे सहाच्या दरम्यान येते.माझ्यासारखी अजून पाच-सहा पोरं,आमचा मालक सकाळी सकाळी कुठलाही दांगुडा न करता गाडीमधुन पार्सल काढायचे,व्यवस्थित रचायचे बारा वर्षापूर्वी आठवते जेव्हा सकाळ पेपर एक रुपयाला होता तेव्हा कन्नड शहरात सत्ताविसशे पेपर आम्ही रोज तीन तासात वाटत असायचो पूर्ण सायकलवर...

ते दिवस काही औरच होते,डिजिटल मीडिया,सोशल मीडिया आली आणि वृत्तपत्र वाचकाचे प्रमाण दिवसंदिवस कमी होत गेले.जो आलेख आजही उतरता आहे पण जे खरे वाचक आहे,ज्यांची पहाट अजूनही पेपर शिवाय होत नाही असेही वृत्तपत्र चाहते खूप आहे जे सकाळीच या कुडकुडत असलेल्या थंडीत पेपरवाला कधी येईल अन् कधी तो त्याचा
"पेपर मावशी,काका पेपर..."
हा आवाज कानी पडेल याची वाट बघत असतात...

आठवणीचे हे दिवस जेव्हा लिहायला घेतो तेव्हा,थंडीच्या या दिवसात नाक्यावर असलेल्या बस थांब्याच्या ठिकाणी चौकातील स्ट्रीट लाईटच्या उजेडात एका विशिष्ट शैलीने पेपरचे पार्सल फोडले जायचे.मग त्यांना व्यवस्थित रचून तीन भागात ठेऊन एक पूर्ण पेपर तयार केला जात असत. तो सर्वात वर मुख्य पेपर,मग तालुक्याची पुरवणी,त्याच्या आता दररोज वेगवेगळी प्रकाशित होणारी पुरवणी हे सर्व व्यवस्थित जोडून झाले की स्थानिक ठिकाणावरून कुणी जाहिरात करायची म्हणून पोंपलेट घेऊन आले की ठराविक शेकडा किंमतीत आम्ही ती टाकून देत असायचो,ज्या दिवशी ही पोंपलेट असायची त्या दिवशी एक-एक चहाचा ग्लास चहा सर्व पेपर वाटप करणाऱ्या मुलांना भेटत असायचा...

या कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटे सहाच्या सुमारास नाक्यावर भिंतीच्या आडोश्याला बसून चहा पित पेपर वाचायचं जे सुख भेटायचं ते आज नाही अनुभवता येत,मग तो पेपरचा भला मोठ्ठा गठ्ठा सायकलला बांधायचा अन् साऱ्या शहरात ठरवल्या ठिकाणी पेपर पेपर करत पेपर टाकत सुटायचे...

विशेष काही नव्हते यात,सामान्य गरीब पोरं जे करायची ते मी करायचो छान वाटायचं,हाताला दोन पैशे लागायचे अन् या रोजच्या पेपर टाकण्यातून व्यवहारी जगात सर्वत्र कसं जगायचं हे ही ज्ञान मिळत गेलं इतकंच...

आयुष्यभर जगण्याला व्यवहारीपणाची जोड देऊन बघण्याची सवय हे जगलेले बालपण लावून गेले याची कधीतरी खंत वाटते तर कधी आपलचं लवकरच शहाणं झाल्याचं मनात येऊन जाते मग आनंदही होतो...
पहाटेच्या दोन-तीन तासात उभे आयुष्यभर पुरेल इतकं काही हे दिवस देऊन गेले,देऊन जायचे...
आज पूर्वीचे दिवस आठवले की,आपसुक मनात येऊन जातं की इतकं प्रामाणिक होवून पुन्हा एकदा आयुष्य जगता यावं कायमचं....

Written by,
Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...