"वसंत रानावणास आता आवरत आहे"
वसंत रानावणास आता आवरत आहे,पालापाचोळा रानात चहूकडे बिनघोर वावरत आहे....
दूर कुठंतरी झळई गरम वाऱ्याची तुटती आहे,झरे केव्हाच रिकामी झाली अन् रिकामी पाणवठे आता मी पाहे....
लवलवणारी तरू आगीच्या भक्ष्यस्थानी पडती आहे,जंगल कपारी मनुष्यजातच ती आता वणवे जाळती आहे....
लागली नजर कुणाची जंगलाला भोकाड वस्ती मज ती भासते,प्राण्यांपेक्षा मनुष्यवस्तीच तिथे मला जास्तीची दिसते....
वाहटुळ घालते घिरट्या उंच आकाशी,पक्षीच गेले कुठे आता कल्पनेतली पक्षीच त्यात मी पाहे....
डोईवर सागाची टोपी अन् कोरडेठाक अश्रुंवाचुन डोळे,इथे माणसेच झाली आहे प्राण्यांपेक्षा भोळे....
वसंतात गळती जंगलास लागली आहे,डोळ्यांनी दूर दूर वणवे आता पेटते मी पाहे....
मिळेना तहान भागविण्यास पाणी मलाच आता येथे,अन कल्पनेतल्या न अटणार्ऱ्या झऱ्यास आता मी पाहे....
एक झाड ते फासावर लटकले आहे,फाशी देण्यास आधार आता मात्र त्याला माणसांचाच आहे....
भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र). मु.पो:कन्नड जिल्हा:औरंगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा