एकटा फीरत असलो की येऊन जातो चालत चालत रस्त्यानं घाटात,चालत राहतो मनातील विचारही माझ्या सोबत चालत राहतात....
समोर दिसतो तो विस्तारलेला खुप मोठा रानपसारा,रस्त्याने जाणारी येणारी मोठ्ठाली वाहनं त्यात ट्रका घाटात मोसम कटू नये म्हणुन फुल स्पीडने रेस होत असतात लोड खुप असल्यामुळे...
कधीतरी असे वाटत असते की,त्या तश्याच मागे आल्या तर एकदाचा माझा हा भटकणारा जीव तरी घेऊन जाईल.निपचित पडुन राहील मी त्यावेळी नाही वल्गना करणार तांब्याभर पाण्यासाठी सुद्धा कोणाची,पण नाहीना येत त्या ट्रक मागे त्यांनीपण ठरवले आहे की काय कोणास ठाऊक पुढेच जायचं अन् मला अजुन या मूर्ख जीवनात जगत ठेवायचं....
तोंडावर धूर सोडुन निघून जातात माझ्या साल्या पण कधीतरी पुढच्या वळणावर जेव्हा अशीच एक ट्रक पलटी होऊन जीवन मरणाच्या शेवटच्या थरारक क्षणांना जेव्हा तो जगत असतो,तेव्हा माझा हात साला एक तांब्याभर पाणी सुद्धा देऊ शकत नसतो....
तेव्हा असं वाटतं कलंक करून टाकावा या हाताचा,इतकं कसं निष्टुर असतो आपण.इतके कसे त्यावेळी भावनांच्या आहारी गेलेलो असतो समजत नाही,जेव्हा रक्ताचा ओघळ भर रस्त्यात वाहताना दिसतो एक मिनट सुद्धा ही जिंदगी थांबत नाही लोकांची....
तो मात्र विव्हळत क्षणाक्षणाला मरत असतो,हे सगळ वाईट आहे.तेव्हाच मात्र तो म्हातारा तळतळ करत असतो गेलाय कधीच एक जीव निघून,आपण झालो होतो काही वेळासाठी जिंदे मुर्दे इथे....
तो गेला होता जीवंत जिंदगीच्या या रंगमंचावर एक घाट मरणाचा चढुन,आपण मात्र इथेच जीवनमरणाचा रोज रोज तो पडणारा फालतू प्रश्न घेऊन जगणार आहोत....नाही काम येत कोणी कोणाला अचूक आहे हे मी वेधतो अन् चालत राहतो वेड्यासारखं सोबतीला विचार घेऊन....
घाटात काही नसत सोबत पण अनेक दृश्य दिसतात,ती वाळून चाललेली वनसंपदा सुखलेली ती सागाची मोहाची झाडं,कुठं तरी मध्येच फुलणारा तो गुलमोहर याची मला ओळख नाहीये. तो म्हातारा करून देत असतो भेटत असतो कधीतरी....
भर दुपारच्या उन्हात रस्त्याने घाटात चालताना दिसतो तो कधीतरी,खुप वाढलेले केस रट झालेली दाढी अन् अनवाणी असतो.जेव्हापासून बघतो तो पायात काहीच घालत नाही आज भेटला होता....
चेहर्यावर अनेक प्रश्न घेऊन फिरत असतो काय करतो कसा राहतो माहित नाही,खांद्यावर लटकलेल्या दोन कळकट झालेल्या पिशव्या अन् शोधत असतो काहीतरी या घाटात असलेल्या वनात.आज जेव्हा न राहून विचारले तर बोलला की,आज इथे आहे उद्या तिथे आहे जीवन जगण्याचे हेच माझे न उमगलेले कोडे आहे....
#हरवलेल्या_लोकांच्या_दुनियेतला_मी_एक_खुळा....
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा