कुठेतरी व्यक्त व्हायचं असत,भावनांच्या आड लपून रोज-रोज तोच कोंडमारा,तो कोंडनारा श्वास फक्त चालू ठेवायचा आहे,म्हणून फक्त व्यक्त व्हायचं आहे....
चार भिंतीच्या आड बंधिस्त होनं काय अन् या पृथ्वीच्या अंडाकृती मध्ये कैद होनं काय सारखच आहे,पण.... पण काय आहेना हे मन थाऱ्यावर असलं तर सगळ अव्यक्त ठेवता येतं....
त्यामुळे मग असं अधून-मधून पडलेले मनातील उत्तर अन् त्याच उत्तरांना पुन्हा पडलेले प्रश्न हे चक्र काही संपत नाही,पण कुठेतरी विसावा दोन क्षणांचा अन् बळजबरीचंच मनाला हायसे वाटावं म्हणून व्हायचं व्यक्त कधीतरी...
मग ते बोलण्यातुन असेल नाहीतर लिखाणातुन असेल,इतकेच नाही जमले तर बस मनसोक्त बंद कावडाच्या आत उशीखाली तोंड घालून रडून घ्यायचं,पण व्यक्त व्हायचं....
कालपरवा एका कोणत्यातरी पुस्तकात वाचलं,जे चालू काळाच्या एखादं शतक मागचं पुस्तक असेल,माणूस स्वत:च्या शरीराशी व्यक्त होऊन पण मनातील अव्यक्त भाव अन् चाललेली घुसमट थांबवू शकतो.हो अगदी तेच Masturbation,म्हणजे लेखन काय चुकीचं अन् काय बरोबर शिकवत हे आपण ठरवायचं असत,यात काही गैर नाही...
कधीतरी तो मनातील विद्रोह मनाशीच चालेला शोधत असतो मी,मन कधीतरी घेऊन जात असतं त्या वाळवी पडलेल्या घरात जिथं घुशीनं बीळ केलं आहे.आता इथे मला काय प्रश्न पडावे ती आई होणार आहे म्हणून ती हे बीळ करून तिच्या पिलांना इथं ठेवणार आहे का ? की उद्या पाऊस आला तर यात पाणी जाऊन ते बंद होऊन जाईल ? मग ती कुठे जाईल.... ?
मन थाऱ्यावर नाही राहत,आता ते काल झालेल्या वपु यांच्या जन्मदिनाच्या सांजेचा विचार करत होतं,पण आता काय ते आज त्याच सांध्यपर्वाच्या कवीचा कवी ग्रेसांचा स्मृतिदिन आहे ते विचार करत आहे.तेव्हा मी काय बोलु माझी हयात नाही त्यांच्याबद्दल लिहायची,तेव्हा विनम्र अभिवादन इतकंच म्हणेल....
राहिलं मन थाऱ्यावर नाही हे खरं आहे,कुठेतरी अडगळीच्या खोलीत ते आता काहीतरी लिहत बसलं आहे.अन् तितक्यात ते बर्मुडा ट्रँगलच्या त्या खोल गर्तेत जाऊन घळघळ खुप खोलवर जाऊन, पुन्हा त्या बुडालेल्या महाकाय जहाजात टायटॅनिक मध्ये चालू काळानुसार रॉकस्टार होऊन,गिटार हातात घेऊन "My Heart will go on" गाणार आहे त्या पाण्यातसुद्धा.
कारण त्याला आज श्रद्धांजली वाहायची आहे त्या जहाजात मृत्युमुखी पडलेल्या फक्त त्या एकट्या राणीला,बाकीचे त्याला फक्त तिथं साथ देणार आहे खुद्द या मेलेल्या मनाला...
म्हणुन हे असं भटकनार मन आहेना त्याला सावराव लागतं वेळोवेळी,व्यक्त करावं लागतं, नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती करायला कमी करत नाही ते.कारण.... त्याचा एक वेगळा इतिहास आहे,त्याला सातवीला असतांनी फक्त इतिहासात पहिलाच नंबर लागायचा,मग तो गणितात नापास झाला तरी तो खुश असायचा....
राहिलं मन गुंतने अन् गुंतवून घ्यायचं तर ते या बाबतीत खुप भोळ आहे,असत...हे माझ्या बाबतीत नाही सर्वांच्या बाबतीत आहे.ते नेहमी योग्य निर्णय घेत पण व्यक्त होणाऱ्या शरीराला त्याच भोळं असण इतकं आवडत नाही,की ते त्याच्या रक्तात भिनलेलं आहे,ते मनाचं कधीच ऐकत नाही,ते फक्त मृगजळाच्या नादी लागुन मृगजळात सुख शोधत बसतं...
कधीतरी धाप्यावरच्या लाल भडक विस्तवासारखं झालं का मग करायचं कैद त्याला,धौतमध्ये असलेल्या शाईतुन.अडगळीतल्या वाळलेल्या खिचडीच्या शित पडलेल्या पानावर डायरीतल्या...
#मन_अन_त्याच्यासोबतचं_Clindstaine_Love....
Bharat Sonwane....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा