किती वेळा लिहावे तुझ्यावर,
माझ्या लिहण्याने नाहीये काही फरक पडणार होना गं....
खरं सांगु मागे एकदा तुझ्यावर कविता केली होती,बलात्कार होतोना जसा तुझ्यावर तशी उधळुन लावली होतीस तु ती माझ्यावर....
माझं मुक्तपणे व्यक्त होणं असत ते कवितेमधून तुझ्यासाठी,पण या कवितेतुन काही भेटत नाही तुला अजुन उलट होते जे नको हवे असते ते जागे होतात वासनेचे शिकार....
तु नेहमी विरोध केला माझ्या या कवित्वाचा मला जे कधी उमगले नाही,तुला नुसत्या अबोल कविता नको हव्या होत्या तुझं दुःख समजुन घेणारा मी हवा होतो....
त्या दिवशी ते काहीतरी वेगळच ऐकलं की लेकच बापाच्या कुशीत सुरक्षित नाही,आता इतकं काही होऊन गेल्यावर माझ्या या कविता कोण ऐकणार आहे ज्यातही बलात्कार अन बलात्कार हेच लिहलं आहे....
खुपदा ठरवत असतो तुझ्यावर कविता करायच्या नाही आता खुप झालं तुला त्याच कौतुक नसतं, मी चार लोकांना समजुतिचं बोलो की मीच वेडा ठरत असतो मग आधार कुणाचा घेऊ कळतच नाही...
अलीकडे काल परवा झालेल्या भेटीत तु मला बोलुन दाखवलं होतं,अरे कविता बिविता सारं झुट असत,वासनेचे शिकार असलेले काहीजण तुमचं ते नागडं कविपण माझ्या शरिरावर ओरखडत लिखित रुपात शब्दांचा जोर देत बळजबरी करता मला,ते सावरारे नाही सहन होत मला तो शब्दांनी भावना जागवत रोज रोज लिखित स्वरूपात केलेला तो बलात्कार....
#बलात्कार_तिच्यावर_असाही_शब्दांचा....
Written by,
Bharat Sonwane....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा