मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेले_अनेक_प्रश्न_अनेक_उत्तरं_भटकताय_वणवण_करत

कधीतरी ऑफीसमध्ये भरदुपारी डोळे लागतात, तेव्हा असे वाटते की नाही आता रेस्टरूम मध्ये जाऊन झोपून रहावं.....

हो होत असं कधीतरी,पण दुपारचं झोपणं हे रात्रीच्या झोपण्यासारखे नसतच विचारांचं काहूर इथे मानगुटीवर स्वार असत.मग काय अनेक प्रश्न असतात....

प्रॉजेक्ट पुर्ण होईल का ? तो पसंद पडेल का ? कंपनीला माझ्यामुळे फायदा/नुकसान होईल का ? असे अनेक अनेक प्रश्न.काम चालुच असतं अन् मग काय....

दुपारची झोप असते ती मात्र विचार रात्रीचेही येऊन जातात डोक्यात,तुझा भास होऊन जातो अनेकदा पण कल्पनेतला स्पर्श कल्पनेतच राहून जातो....

रात्रीच्या प्रहरी टेरेसच्या पन्हाळातुन बाईकच्या सिट कव्हरवर पडणाऱ्या पाण्याचा तो आवाज, मग संथ संथ शांत झालेली ती त्याची कमी.अन् फक्त त्या पडणाऱ्या धारे पेक्षा स्पष्ट ऐकू येतो तो टप टप पडणारा पाण्याच्या थेंबांचा आवाज....

सोबत पेट्रोलचा नाॅक चालु राहुन गेल्यामुळे वाऱ्याच्या झुळके सोबत येऊन जाणारा तो सुवास,डोकं पार सुन्न सुन्न होऊन जातं.मग ऐकू येते मध्येच घड्याळाच्या काट्यांची लगबग एकमेकांच्या पुढे जाण्याची....

यांना रोजचं माहीत असुन देखील का हे वेड्यासारखे फिरत असतील ? का कुणास ठाऊक ? शेवट तिघेही एकाच ठिकाणी येऊन थांबणार आहेना,पण असो यांना कोण समजवणार जेव्हा आपल्या सारखे सजीव माणसे रोज रोज काही कारण नसतांना ऑफिसला येतात....

आता या विधानावरून वाद घालण्यापेक्षा मीच सांगतो,खरच आपण पण त्या घड्याळाच्या काट्यासारखे जीवन मरणाचा शर्यतीत इतकी हरवलो आहे की पुढे जाण्याची आस ही ऑफिसमध्ये ही स्वस्थ बसू देत नाहीये....

विचारांचे काहूर अन् हरवलेलं जगण्यातलं शहाणपण सोडलंय आपण,मागेच सकाळी येतांना जेव्हा त्या उड्डाणपुलावरून बाईक थांबुन खाली खालचे लोक अन् जगण्यासाठी चालेली त्यांची स्पर्धा बघितली बस्स तिथेच हे अन् मी सगळ हरलो आहे....

एक वेळ वाटत होत की टाय, सूट-बूट, शर्टिंग केलेला मी बसून राहिलो या पुलाच्या कठड्यावर व शोधत राहिलो या शहरात सुख,चैन भेटंल का मला ?  पण माझं मन यालाही तयार नसतं....

का तर... त्याला हाव असते रात्रीच्या झोपेची अन् भीती असते झोपेआधी विचारल्या जाणाऱ्या मनातल्या अन् जबाबदाऱ्यांच्या प्रश्नाची,नाही मग काही शक्य....
साठवुन घेतो त्या उड्डाणपुला खालच्या दुनियेला अन् हल्ली यांत्रिकीकरण इतकं झालं आहे की, फक्त सेल्फ मारून तो निघून जातो विचारांना मनातल्या....

कधीतरी ऑफिसमधून केबिनच्या पलिकडले दृश्य मनात घर करत बसलो असतो,पण इथेही सर्व विचारांनीच गस्त घातली आहे,मग तो पडदा हटवून सावरून घेतो डोळ्यातील आसवांना....

अनेक प्रश्नांना ज्यांची उत्तरे सकाळपासून शोधत असतो ती नाहीच भेटत,पण मनाला अन् समोर ठेवलेल्या त्या माझ्यावरच्या कंट्रोलरला हे कसे कळणार नाही का ?

मग काय बस काम काम अन् काम घड्याळाच्या काट्यांची बेरीज जुळून आली की पुन्हा तेच सर्व सावरायचे स्वताला,आवरायचं विचारांना अन् स्वतंत्र होयच पुन्हा कैद होण्यासाठी....

#हरवलेले_अनेक_प्रश्न_अनेक_उत्तरं_भटकताय_वणवण_करत....

Written by,
®Bharat.L.Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...