सूनो...सूनो...
भाईयो,बहेनो, नौजवानों सूनो...
आज श्याम को मिथुन का फिल्म लगणेवाला है ठीक नौ बजे....
उर्सात अशी हाक यायची अन् मी काही वेळासाठी स्तब्ध होऊन जायचो,एकाच ठिकाणी उभा राहून त्या पिक्चर टाकीकडे बघत राहायचो.तो टाकीच्यावर एक माणुस उभा असायचा त्याचा हा मार्केटिंग करायचा फंडा मला खुप आवडायचा....
हातात एक झटकण्यासाठी काठीला बांधलेले फडकं हात हलवत हातवारे करायचा,त्याच्या सोबत एक बुट्टा माणुससुद्धा असायचा जो माझ्यासारख्या पोरांना हात दाखवत आम्हाला खुश करायचा....
मला वाटायचं हेच अमिताभ,मिथुन,सर्व आहे.
कधी कधी एखादी सुंदर कटम्याडी घातलेली तरूणी पण त्या टाकीवर चडून सर्वांना चित्रपट बघायला या असे हातवारे करून सांगत असायची....
मराठी चित्रपटांसाठी यापेक्षा थोड वेगळं असायचं,त्याचं पोस्टरच पूर्ण कथा सांगून द्यायचं. अन् ते पाहून त्या वेळच्या हौशी स्त्रियांना तो चित्रपट बगयाला जायचं हे ठरलेलं असायचं,
कधीतरी एखादी अभिनेत्री यायची मग चित्रपटाचे तिकीट ती स्वतः वाटायची अशीच माझीही एक आठवण आहे...
एकदा ऊर्सात माहेरची साडी हा चित्रपट आला होता,त्याचे तिकीट वाटायला अलका कुबल या होत्या.काय मग त्या दिवशीचे सर्व शो फूल होते त्या चित्रपटाचे....
आमच्या आईची अलका कुबल खुप आवडती, मग काय आमचे पूर्ण कुटुंब,शेजारचे सर्व कुटुंब त्यात आमची मम्मी,शेजारची काकू त्यांच्या मुली तर विचारूच नका किती खुश होते.मस्त सर्व आई वडिलांसोबत पाहिलेला तो माझा पहिला चित्रपट आजही आठवतो...
आजवर असा चित्रपट बघितला नाही कारण त्या दिवशी टाकीमध्ये सर्व स्त्रिया अन् पुरुषही जवळ जवळ रडले होते,त्यात आईला सुखावणारी अजुन एक गोष्ट म्हणजे आईला अलका कुबल पुढे होऊन भेटली बोलली.मग काय आम्हीपण खुश....
पुढे खुप वर्ष खुप चित्रपट उर्सात बघितले,खास वडिलांच्या आग्रहास्तव मेला हा चित्रपट सर्व कुटुंब मिळुन बघितला होता.तो आजही आठवतो पण नंतर मात्र हे सर्व हरवले....
आता नाही जात मी कधीच उर्सामध्ये अन् गेलोच कधीतर,फक्त थोडीफार काहीतरी खरेदी असते, कारण ते माणूसपण हरवलं आहे अन् ते माणसेही....
#आठवणीतले_गोड_दिवस...
Written by
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा