तो आजही आठवतो परभ्या मेरी जान साला... दुनियादारीच्या नादी लागून या मित्राला गमावून बसलो...
नेहमीप्रमाणे रस्त्याला खेटून असलेल्या पुलावर बसुन मी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना बघत मी एकटाच बसुन राहायचो पुलावर.मस्त हापचड्डी,फुल बाह्याचा ड्रेस घातलेला असायचा रस्त्याने येणारी थंडगार हवा शरिराला लागायची,पुलाखालून येणारा पाण्याचा आवाज खळ..खळ... खुप सुंदर
वाटत असायचा....
तेव्हा माझा मित्र परभ्या मला भेटायला यायचा, पाच-सहा दिवसांतून एकदा यायचा तो.भोळा होता बिचारा पण माझा लाडका होता,साधारण फाटलेले कपडे घालायचा,पण त्याला सुद्धा तो विन करायचा....
दोन्ही पायात दोन वेग वेगळ्या चप्पल व नुकताच तरुणपणात पाऊल ठेवत असल्यामुळे आलेली ती त्याची बोकड्यासारखी दाढी,अन् बारीकशी मिशी भारी दिसायचा तो या अवतारात....
माहीत नाही पण लहानपणी तो काही कारणास्तव थोडा भोळसर झाला असावा.त्याची माय पण त्याच्या सारखी विस्कटलेले केस,फाटलेली साडीमध्ये असत पण मेहनत करायचे दोघेपण....
शहरातल्या चौकात बसून असायचे धुळीला माखत शहरात एखाद डुक्कर,कुत्रं मेलं की परभ्याला लोकं बोलावून आणायचे.परभ्या हे काम चांगलं करतो हे शहरात सर्वांना माहीत असल्यामुळे असे काही झाले की लोकं त्याच्याकडे येत असत....
परभ्या इस-तीस रुपय अन् दोन वडापावच्या बदल्यात ते डुक्कर कुत्र शहरापासून दूर एकांताच्या जागी,म्हणजे मी बसायचो त्या पुलाखाली आणुन टाकायचा.
परभ्या भोळा होता पण त्याच्या या कामामुळे तो शहरात सगळ्याला आवडायचा,त्याला कुणीपण त्रास द्यायचं नाही.भाकर कुटका जे असल ते परभ्याला सर्वजण आणुन द्यायचो आम्ही..
परभ्याला गाणे म्हणायला खुप आवडायचे,चार-पाच दिवसांनी आला की परभ्या आला आहे हे दूरवरून त्याचे गाणे ऐकून कळायचे,मग मी पण त्या पुलावर जाऊन बसायचो....
परभ्या त्या डुकराला दोरी बांधून,ती काठीला बांधून दोन्ही पायांच्यामध्ये घेऊन त्या डुकराला ओढत ओढत घेऊन यायचा.सोबत त्याचे दर्दभरे गाणे म्हणायचा,ऐकून काय तर मला आवडायचा तो खुप.यारा हो यारा..!,जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास अा गाये..! असे गाणे म्हणत तो रस्त्याने त्या डुकराला ओढत घेऊन पुलाकडे येतांना दिसायचा....
पुलाखाली त्या डुकराला सोडून आला की येऊन बसायचा पुलावर काहीवेळ माझ्या जवळ,मला म्हणायचा,क्या चल रहा है दोस्त...?
मी पण बोलायचो,कधी कधी तर खुप शाहण्यासारखं बोलायचं पण कधीतरी काहीतरी विचित्र बोलायचा पण ते मनाला लागल अस बोलायचा....
तो भोळा नव्हता हे पक्कं खरं होत... परिस्थितीने त्याला भोळं केलं होतं,तो जातांनी आमचं ठरलेले असायचे.पुलावर घोडा करून बसायचं व पुलाखाली बघून मोठ्याने दोन-तीन गाणे म्हणायचे,ज्याचा आवाज खाली घुमायचा अन् आम्हाला पुन्हा ऐकु यायचा....
परभ्या हसत म्हणायचं अरे खाली आपले दोस्त आहे काय यार भाई...ते पण गाणे म्हंत्या अन् तो पुन्हा दोन्ही पायाच्या मध्ये काडी टाकून गाणी म्हणत मला चल भाई जाता हुं,कोई और डुक्कर,कुत्ता मर गया तो आउंगा मिलने दोबारा,तु यहां रहे असे म्हणत निघून जायचा...
मी बघत राहायचो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे,कधीतरी यायचा तो पुन्हा.
पण मी या दुनियादारी मध्ये हरलो,कर्तव्याच्या डोंगरात हरलो अन् माझ्या या दोस्ताला कायमचा हरवून बसलो....
कधीतरी दिसतो मला तो,पण आता नाही ओळखत तो मला.कदाचित मी त्याला विसरलो म्हणून ओळख देत नसेल होनं तो...?
#परभ्या_हरवलेल्या_दोस्तातला_राजा_माणुस...
Written by,
Bharat Sonwane....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा