ऐकन आठवणींच्या कवि संमेलनात झाल्या कैक कविता सादर करून माझ्या,तू पण घे म्हणतो मनावर अन् कर भावना व्यक्त तुझ्या....
प्रत्येक कविता साजरी करतो तुझी दाद मिळावी म्हणून,तू पण कधीतरी अलवार डोळ्यांनी व्यक्त करत जा साथ तुझी माझ्याकडे बघुन...
कधीतरी एखाद दोन शेर पेश होतात गझले आधी फक्त तुझ्यासाठी,तू ही म्हण एकदा इर्शाद अन् कर एकदा सुटे दोन शेर माझासाठी...
मी कविता करतो त्यातही तुच असते,ऐकतानही डोळ्यांची डोळ्यांना साथ देणारी खरच तू मला माझीच लाडकी चारोळी भासते...
मी नाही करत कधी व्यक्त मनाला आपल्या
अव्यक्त नात्यावर,पण आठवणींच्या प्रत्येक क्षणाला कविसंमेलनात सादर करतो तुझ्यावर...
भारत सोनवणे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा