शृंगारिक काव्य लिखाणाचा प्रयत्न प्रथमतः करतो आहे...
#कवितेच्या प्रेमात...
ढळता सांज तोल मी माझा ढळनारा किती सावरावा,होतील किती छुपे इशारे तु फुकट्या दुनियेशी चाललेला व्यवहार तुझा आता आवरवा....
व्यवहार जगण्याचे मांडले तु किती आता अन् नाकारले किती,गणित नाही जुळणार तुझे होकार माझा मला नाही आता भीती....
ढळणाऱ्या सुर्यानेही आता गप्प ढळुन जावे,नको आहे कारण चंद्राला त्याला आहे उगवण्याची दिली मी अनुमती....
सुगंध केवड्याचा दरवळत आहे काखेत तुझ्या,मलाच का वेढ लागले रातराणीचे गुलाब आहे जेव्हा जवळ आहे माझाच माझ्या....
ही रात्र न ढळावी युगानुयुगे तुझी अनुमती अन् नयनांना भेटायची तयारी असावी,नजरेनेच नजरेला इशारा अन् पापणी प्रेमाने तुझ्या मिठीत झुकावी....
दिलेल्या वचनांची पूर्तता व्हावी अन् शेवटी ओठांनी ओठांचीच भाषा ओळखावी,विरोध माझा कश्याला अन् मिठीच माझी तु सावरावी....
मग कौतुकात स्पर्शाच्या तुझ्या माझी कविता व्हावी,तुला मात्र चारोळी ही न सुचावी
शब्दांनी सजलेली ती कविता पहाटे दोघांनी पहावी,तु मला दिलेल्या बळजबरी कवित्वाची मग कुठे जाणीव मला व्हावी....
लिखित:भारत लक्ष्मण सोनवणे(सौमित्र).
मु.पो.कन्नड,जि.औरंगाबाद. मो:९३०७९१८३९३.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा