अर्धमेल्या झोपेत उघड्या सताड डोळ्यांनी स्वप्न बघणे अन् विचारांचे त्यामध्ये गुंतने चालु असतेना तेव्हा नाही लागत मग मला झोप....
तुझा आठवणींचा पसारा कीती पण आवरता घेतला तरी तो सावरला जात नाही,मग काय सर्व आठवणी अस्थ-व्यस्थ होतात.कुठेच नाही लागत कुठला ताळमेळ,नसते कुठली भ्रांत मनाला अन् आतल्या आत ते मन स्वत:लाच खात राहतं....
मग प्रयत्न होतात तुझ्यावर लिहण्याचे हजारदा ते लिहून खोडल्याही जाते.कधी ते मनाला पटत असते म्हणुन फाडले जाते,कधी मनाला ते पटत नसते म्हणुन पण लिहत राहतो काहीतरी....
ते जपवुन ठेवत राहतो जीवापाड जपत असलेल्या त्या डायरीत,जिच्या आत अनेक पानं दुमडली जातात कायमसाठी,काही कधीतरी उघडण्यासाठी.अनेकदा अनेक अक्षरे यात आसवांचे टिपुस गळुन खोडलेही जातात,कारण शाई नाहीयेना माझ्यासारखी....
तुझा आठवणीं सोबत राहणार आहेच,शाईही तीच काम करते पण आसवांना कुठेतरी हे सांभाळणे नाही जमत.म्हणुन व्यक्त होऊन जातात ते असे कधीतरी....
पण काय गं हा 'पण' कायम असतो आपल्या प्रत्येक आठवणींत,रमणे असो कींवा रमवून घेणे असो सर्व बळजबरीपणाचा आव आणुन जगायचे असते.मग बरेचदा ठरवुनही नाही जमत स्थिर राहणं मनाशी सलग खरं राहणं स्वत:शीच....
कधीतरी तो एकांत अन् कधी तो स्पंदनाचा अलवार होणारा श्वासांना स्पर्श भेदत असतो कीत्येकदा,नाहीच जमत या आठवणी अजूनही बऱ्यापैकी उतरवायला लिखित स्वरूपात,कैद करायला अजुन पात्र व्हायचे आहे यासाठी तुझ्यासाठीही मलापण....
#गणितं_नं_सुटलेली_कायमची...
Written by,
bharat.sonawane.374.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा