मी वेडा भुकेचा....
आम्हीच ठरलो ठार वेडे इथे कित्येकदा जेव्हा जुळवता नाही आला भुकेचा व जगण्याचा प्रश्न...!
रितेपणाच्या ओंजळीत वेचली कैक फुले सुगंधाची,जेव्हा मार्ग जगण्यासाठीचा शोधाया निघालो बेसूर दुनिया मला सारी भेटली...!
डोळ्यांना सोबत आसवांची करून घेतली कायमची,निष्ठुर देहाला उपासमारीचा चिमटा घेऊन जगत आलो घाई नाही केलीये परतायाची...!
संवाद कधीतरी जगण्याशी हरलेल्या बेताल वक्तव्याने केला,मी जगत राहिलो अन् जगतांनाच रोज थोडा थोडा मी वेडा मरत राहिलो...!
गणिते नाही जुळलेली कधी पोटासाठी भाकरीची,अनवाणी पायांनी हरवलेल्या वाटेला मी वेडा शोधत राहिलो...!
सूर्य उदयाला एक मागणी करत राहिलो जगण्यासाठी,अस्थाला जातांनी सूर्य मी वेडा फक्त रिकाम्या पोटासाठी लढत मरत राहिलो...!
पुन्हा रोजच होते सकाळ भेटल काहीतरी या आशेने पोटाला,अन् मी वेडा फक्त झोळी घेऊन मावळलेल्या आश्याना घेऊन भिक मागत राहिलो...!
लिखित: भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र)
मु.पो.कन्नड जि.औरंगाबाद.
संपर्क 9075315960/9307918393.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा