काहीबाही लिहिलेलं..!
कुठेतरी शब्दांना धारदार तलवारीच्या पात्यांचे स्वरूप देऊन संविधानाला लक्षात घेऊन लिहणारा तू नामदेव ढसाळ वाटतो.तर कधी सांजेच्या प्रहरी शब्दांना चांदण्यात मोजणारा,अन् कधीतरी स्मशानात जळत्या प्रेताच्या उजेडात उडत्या विस्तवावर कविता करणार तू ग्रेस वाटतो.कधीतरी रेल्वे स्थानकात तुझ्या कविता रेल्वेच्या आवजाशी हितगुज घालू बघता,अन् तू तिथेच तुझे तारुण्यातले जीवन कवितेला वाहून देतो.तेव्हा खरच तू कवितेला शोभणारा,तिच्यासाठी असणारा बालकवी शोभतोस...
हे आणी... इतर सर्वच कवी आहेना हे जगायला शिकवतात.तुम्ही म्हणाल मी पण आता काहीतरी कवितेशी जुळवून व्यक्त होणे,अव्यक्त राहणे याबद्दल लिहत असेल तर तसे काहीही नाही.पण काय असतं जेव्हा कुठेतरी त्या क्षणाची (जो क्षण आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी झुरवत ठेवत असतो) आपल्याला जाणीव होत असते,तो तेव्हाच कृतीत व्यक्त करून मोकळे होऊन जायचे असते...
कसे आहेना,
लिहत्या हाताला आपण खूप वेळा विचारून बसतो की,
तुम्ही हे कसे लिहतात...?
कसं सुचतं..? कोणासाठी..?
असे अनेक प्रश्न...
या प्रश्नांना खरंतर उत्तरं नाही,
फक्त कोणाला विचारांना लिखित स्वरूपात व्यक्त करायला आवडते,कुणाला लिखान करूनही मनातले व्यक्त करता नाही येत जे मनात चालू असते,जे त्याला सांगायचं असते...
त्याला आपण म्हणू शकतो की मृगजळाला भासवत लिहिणे (आता इथं मृगजळच का तर ते सोयीचं वाटतं माझ्यासाठी) तो जगत असतो काहीतरी अन् लिखाणातुन व्यक्त होतो ते काही वेगळंच....
नेमका तोच कुठेतरी या जगण्यातल्या चढाओढीला साधतो अन् यशस्वी होऊन जगतो.पण हे सर्व थोडक्यात संपणारे असते कारण त्याचं सत्यात जगणे हे मर्यादित असते,याउलट तो एक असतो जो व्यक्त करत असतो,उलगडत असतो आपल्याच कवितेतून,लेखातुन आपल्या जीवनपटाला....
हे दोन्ही व्यक्ती मला खूप भावतात,अलीकडे कधीतरी लेखन स्वरूपात दिर्घ व्यक्त होणारे लेखक त्यांच्या लिखाणात खूप काही सांगत असतात.ज्यामधुन खूप काही भेटत असते यासाठी वाचत राहणे महत्त्वाचे वाटते...
हो आता
यात कसं सुचलं..?
या प्रश्नाला उत्तर नाही कारण कधीतरी तो लिखाणात त्याचं 'स्व' लिहत असतो,तर कधी कल्पनेत फुललेलं जीवन...कधी काय तर कधी काय याला उत्तर नाही,हे कसं सुचतं तर जगण्यातुन आलेला अनुभव,सभोवतालची परिस्थिती,वगैरे वगैरे खूप कारणे असतात...
लेखकाची माझ्या नजरेतून केलेली व्याख्याच अशी आहे की,डोळ्यांना दिसणाय्रा समोरील दृश्यापेक्षा,ज्याला आपल्या लिखाणातून सभोवताल बर्यापैकी समजतो व्यक्त करता येतो तो लेखक... इथं डोळ्यांना दिसणंच महत्त्वाचं नाहीये तर ते मनाला भावनं व ते बोलण्यातुन व्यक्तं करणं महत्त्वाचं असते...
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा