इंडस्ट्रीयल काहीबाही..! आज रविवार पहाटे जरा लवकरच उठलो. शेविंग क्रीम आणि जिलेटगार्डने घरीच घोटून दाढी केली. औद्योगिक वसाहतीत कंपन्यात काम करायचो तेव्हा हॉस्टेलला राहत असताना मित्र म्हणायचा एकविशीचा नवतरुण आहेस तू घरी का दाढी करतो ? मस्त पार्लरला जायचं वगैरे, पण; दाढी,कटिंगसाठी पार्लर जाऊन शेपन्नास घालणं मला, माझ्या विचारांना कधी जुमानले नाही. मग आपलं हे असं सुरू राहिलं आजतागायत, हा गुण कोणाकडून आला माहीत नाही. कारण वडिलांनी कधी घरी दाढी केली नाही की आजोबांनीही नाही. पण; आपलं हे जे काही आहे ते छान वाटतं. दोन पैसे वाचतात, भंगाराच्या दुकानात गेलं की इतक्या पैश्यात ओळखीचा भंगारवाला दोन पुस्तकं देऊ करतो. नाहीतर दैनंदिन एखाद दिवशीचा वेगळा खर्च वाचून जातो. अंघोळ वगैरे करून बराचवेळ बाल्कनीत खेळत असलेल्या वृत्तपत्राला घेऊन वाचत बसलो. सूर्याची किरणं तोवर बाल्कनीशी स्पर्धा करू लागली होती. नारळाच्या झाडाच्या असलेल्या झावळ्या अन् पहाटेच्या कोवळ्या सूर्य किरणांची स्पर्धा सुरू होती भिंतीवर पहिले येऊन कोण विसावेल यासाठी. दहाचा पार कलला तसं कामगार नगराच्या चौकात थोडं भटकून यावं म्हणून ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!