मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

West Minister Bridge च्या नोंदी क्र ३

West Minister Bridge च्या नोंदी क्र ३ आज पहाटेच तुझा वायरलेस फोन आला अन् तू म्हणाली की अरे मी नऊ महिन्यांची पोटूशी आहे..! पण तू बघतोयना जगात किती अस्थिरता माजली आहे, जिकडे पहावे तिकडे युद्ध सुरू आहे, मी माझ्या बाळाला जन्म देऊ की नको अरे, लष्करात असलेला माझा पती इस्राईल सैन्याच्या सोबतीने गेले दोन–चार महिने बेफिकीर होऊन लढतो आहे.  गाझा पट्टीवर पुन्हा एकदा झालेल्या बाँबबारीमध्ये एक सहा महिन्याचे बाळ पोटूशी घेऊन धावत असलेल्या एका आईला एका सैनिकाने गोळी घालून ठार केलं..! अन् नंतर त्या सैनिकाच्या आतील बाप जागा झाला म्हणून त्यानं त्या बाळाला न मारता तसे तिथंच एकटं सोडून दिलं, ते बाळ साध रांगतही नाही रे ते तिथेच पडून होतं.  नंतर कुण्या पान्हा फुटलेल्या गाझा पोलिशीन बाईने त्याला स्तनाशी धरलं  अन् ऐकणं ते बाळ रडायचं शांत झालं होतं, दूध पित होतं.  या सगळ्यात त्याच्या आईनं काय केलं असावं, तिचं थडगं तिथंच पडून होतं. आठ दहा दिवसांपूर्वी वायरलेस कॉलवर पतीशी बोलत असताना त्याने त्याच्या युद्धाच्या रोजच्या कहाण्या सांगितल्या, आज हे घडलं ते घडलं इतकी माणसं मरण पावली, इस्राईल आता त्याल...