मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Aspirantsमित्रमैत्रिणभेटगप्पाचहा...

सांज ढळायला होती अन् अस्ताला जाणारा सूर्य शहराच्या उंच उंच इमारती टिपत अंधाराशी एकरूप होत होता. शहरातील ऑफिसेस सुटले होते पॉश वस्तीतील पॉश लोकं त्यांच्या पॉश गाड्या घेऊन त्यांच्या घराची वाट जवळ करत होते. शहरातील प्रत्येक सिग्नल गर्दीने भरून गेलेला होता. माणसांची रेलचेल अन् वाहनांचा आवाज या सगळ्या घाई गर्दीत शहर हरवून गेलं होतं.  रमजानची नमाज अदा होत होती. आठ दिवसांवर रमजान ईदच्या सांजेला आकाशात चंद्रकोर दिसली की रमजानची सांगता होणार होती. सांजेची अजाण झाली तसं दूरवरून येणारी हुजुर साहिब डोळ्यांच्या टप्प्यात आली. ग्रीन सिग्नल लाल, लाल सिग्नल ग्रीन झाले ट्रेन औरंगाबादेच्या रेल्वे स्टेशनवर नांदेड जाणाऱ्या माणसांना घेण्यासाठी थांबली. अस्ताला जाणारा सूर्य एरवी काळोख दाटल्या आकाशात हरवून गेला होता. माणसं ट्रेनमधून उतरत होती, कुणी ट्रेनमध्ये चढत होती. दहापाच मिनिटांच्या थांब्यानंतर ट्रेन पुढे नांदेडच्या दिशेनं डिपार्ट झाली. चहा अन् क्रीमरोल घेऊन आम्ही दोघेही बराचवेळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर आम्ही बसून राहिलो. दोघांना अस्ताला जाणारा सूर्य रेल्वे स्टेशनमधून बघायला आवडतं म्हणून दोघां...