एक वेगळं आयुष्य जगणं... मित्रांनो आज सुशांतच्या आडून मला काहीतरी बोलायचं आहे,म्हणजे हेच की त्याच्याविषयी नाही बोलायचं आहे.पण जे काही बोलायचं आहे त्यासाठी तो फक्त एक दुवा असेल या विषयाला सोबत घेऊन बोलतांना... कारण काय आहे की,सर्वांच्या आयुष्यात ही फेझ येतच असते कुणी ते स्वीकारून पुढं वळणे घेऊन निघुन जातो तर कुणी आपल्या जगण्याची वाट बदलून सर्वच मागे सोडुन सर्व विसरून पुढे निघुन जातात.... पण... पण, काय असतं मित्रांनो काही तरुण असो किंवा कुठल्याही वयातील व्यक्ती मग ते कुणीही असो पण मी जे बोलणार आहे हे विशेषतः साधारण 23 ते 32 वर्षाच्या वयातील तरुण वर्गाला.यातही तो वर्ग जो आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी अन् आपला जो जीवनाचा ग्राफ आहे त्यातील carrier नावाचा कॉलम सतत उंचीवर ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारा आहे.... आयुष्यात जेव्हा ऐन तारुण्यात पदार्पण करताना खूप कष्टाने आपण काही मिळवलं असलं अन् तेच जेव्हा ता...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!