एक वेगळं आयुष्य जगणं...
मित्रांनो आज सुशांतच्या आडून मला काहीतरी बोलायचं आहे,म्हणजे हेच की त्याच्याविषयी नाही बोलायचं आहे.पण जे काही बोलायचं आहे त्यासाठी तो फक्त एक दुवा असेल या विषयाला सोबत घेऊन बोलतांना...
कारण काय आहे की,सर्वांच्या आयुष्यात ही फेझ येतच असते कुणी ते स्वीकारून पुढं वळणे घेऊन निघुन जातो तर कुणी आपल्या जगण्याची वाट बदलून सर्वच मागे सोडुन सर्व विसरून पुढे निघुन जातात....
पण... पण,
काय असतं मित्रांनो काही तरुण असो किंवा कुठल्याही वयातील व्यक्ती मग ते कुणीही असो पण मी जे बोलणार आहे हे विशेषतः साधारण 23 ते 32 वर्षाच्या वयातील तरुण वर्गाला.यातही तो वर्ग जो आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी अन् आपला जो जीवनाचा ग्राफ आहे त्यातील carrier नावाचा कॉलम सतत उंचीवर ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारा आहे....
आयुष्यात जेव्हा ऐन तारुण्यात पदार्पण करताना खूप कष्टाने आपण काही मिळवलं असलं अन् तेच जेव्हा तारुण्यातच आपल्यापासून दुरवल्या जातं तेव्हा जी काही होणारी अवस्था असते ती आयुष्यातील सर्वाधिक वाईट अवस्था असते.पुढे आतोनात प्रयत्न करूनही जेव्हा आयुष्यात जेव्हा अपयश पाठ सोडत नाही तेव्हा ती व्यक्ती त्या निर्णयापर्यंत येऊन पोहचते ज्या निर्णयापुढे मग आपल्याला सर्व काही गौण वाटत असते....
अश्यावेळी साधारण सर्वच गोष्टी सोबत असतात शिवाय त्या एका गोष्टीच्या जिच्यासाठी आपलं सर्वस्व आपण पणाला लावलेले असते.माझ्या नजरेतून माझ्यासाठी ती गोष्ट माझं carrier असावी कदाचित परंतु व्यक्तिपरत्वे हे बदलत जाणारं आहे...
Written by,
Bharat.L.Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा