तारुण्यात हरलेलो मी..!
आयुष्याचे गणित जुळवता जुळवता
तारुण्यास मी गमावत राहिलो,
जुळले न गणित केव्हा आयुष्याचे या सारीपाटावर सोंगट्यात त्या मी मला आता शोधत राहिलो !!धृ!!
फासे पडत राहिले,आयुष्य पटावर फिरत राहिले,जाणिवांच्या भकास रानात मी असाच न कारण आता भटकत राहिलो,
फिकीर न आयुष्याची आता फकीर मी झालो,रुजले गेले जे काही त्यातच मी तगदे राहिलो !!१!!
खाली तगारी सम झाले आयुष्य,गोल चंद्रात सुर्यासम लाल भाकर मी बघत राहिलो,
चिमटे पोटाला अन् पडल्या पोटाच्या पिळास मी घटका घटकांचा हिशोब मागत राहिलो !!२!!
ओंजळभर पाणी ओंजळीत माझ्या,कोरड्या पडलेल्या डोळ्यांना आसवांची लकीर मागत राहिलो,
उघड्या डोळ्यांआढ आयुष्य बंदिस्त झाले,भानावलेल्या नजरेत भकास माझे आयुष्य मी बघत राहिलो !!३!!
हिशोब जिंदगीचा अन् हिशोब वयाचा मी करत राहिलो एकशे आठातुन एकशे आठ गेले शुन्यात मी मला अन् माझ्या तारुण्याला बघत राहिलो,
अवांतर न बोलायाचे काही जिंदगीशी केलेला हा खोटा करार मी पाळत राहिलो !!४!!
अन्...
आयुष्याचे गणित जुळवता जुळवता
तारुण्यास मी गमावत राहिलो,
जुळले न गणित केव्हा आयुष्याचे या सारीपाटावर सोंगट्यात त्या मी मला आता शोधत राहिलो !!५!!
-©®भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औरंगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा