IT क्षेत्र आणि "जॉब कट ले ऑफ" गेले काही दिवस "जॉब कट ले ऑफ" या शब्दांना बऱ्याच ठिकाणी वाचनात आले. या शब्दांना लागून असलेले लेख वाचले की, निःशब्द व्हायला होत आहे. कारण अलीकडच्या दोन - तीन महिन्यांच्या काळात अनेक नामांकित कंपन्यांनी कुठलेही कारण न देता कर्मचाऱ्यांची केलेली कपात. कर्मचाऱ्यांची इतक्या मोठ्या संख्येने झालेली कपात व तेही इतक्या मोठ्या नामांकित कंपन्यांमधून. बऱ्यापैकी लिस्टेड, स्टेबल असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून जर अश्या प्रकारे कर्मचाऱ्यांची कपात होत असेल तर छोटछोट्या कंपन्यांच्या धरतीवर असणारी अवस्था किती वाईट असेल यांची कल्पना करवत नाही. गुगलवर "आय.टी. जॉब कट ले ऑफ" असे सर्च केले की समोर येणारी माहिती किती भयावह व वास्तव किती भीषण आहे हे दिसून येत आहे. पुढे भविष्यात ही अवस्था अजून किती वाईट होऊ शकते याची आपल्याला कल्पना हे सर्व बघितले की येते. कामगारांच्या कपातीच्या अनेक वेगवेगळी कारणे आहेत लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या कालावधीत आय टी क्षेत्रातील कंपन्यांना न मिळालेली कामे, वर्क फ्रॉम होमसारखी फोफावलेली संकल्पना, डॉलरची घसरण शेअर ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!