मुख्य सामग्रीवर वगळा

IT क्षेत्र आणि "जॉब कट ले ऑफ"

IT क्षेत्र आणि "जॉब कट ले ऑफ"

गेले काही दिवस "जॉब कट ले ऑफ" या शब्दांना बऱ्याच ठिकाणी वाचनात आले. या शब्दांना लागून असलेले लेख वाचले की, निःशब्द व्हायला होत आहे. 
कारण अलीकडच्या दोन - तीन महिन्यांच्या काळात अनेक नामांकित कंपन्यांनी कुठलेही कारण न देता कर्मचाऱ्यांची केलेली कपात.

कर्मचाऱ्यांची इतक्या मोठ्या संख्येने झालेली कपात व तेही इतक्या मोठ्या नामांकित कंपन्यांमधून. बऱ्यापैकी लिस्टेड, स्टेबल असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून जर अश्या प्रकारे कर्मचाऱ्यांची कपात होत असेल तर छोटछोट्या कंपन्यांच्या धरतीवर असणारी अवस्था किती वाईट असेल यांची कल्पना करवत नाही.

गुगलवर "आय.टी. जॉब कट ले ऑफ" असे सर्च केले की समोर येणारी माहिती किती भयावह व वास्तव किती भीषण आहे हे दिसून येत आहे. पुढे भविष्यात ही अवस्था अजून किती वाईट होऊ शकते याची आपल्याला कल्पना हे सर्व बघितले की येते.

कामगारांच्या कपातीच्या अनेक वेगवेगळी कारणे आहेत लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या कालावधीत आय टी क्षेत्रातील कंपन्यांना न मिळालेली कामे, वर्क फ्रॉम होमसारखी फोफावलेली संकल्पना, डॉलरची घसरण
शेअर बाजारातील घसरण, सगळ्या आय.टी. कंपन्यांना या दोन्ही वर्षी झालेला तोटा, जागतिक / अमेरिकेतील मंदी, फक्त उच्च दर्जाची क्षमता असणारेच कर्मचारी कंपनीत राहतील त्यामुळे कंपनीचा दर्जा चांगला राहील ही भावना असे अनेक कारण याबाबतीत विचार केला की समोर येत आहे.

"काही नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून कुठलेही कारणे न देता,देण्यात आलेला ले ऑफ"

साधारण दोन तीन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गुगल कंपनीने भारतातील ४५० कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता काढून टाकले आहे.
अलीकडे गेल्या वर्षाभरात जगभरातील कंपन्यांमधील कर्मचारी चालू असलेली कपात बघितली तर भविष्यात आय टी क्षेत्रात कामगारवर्गाला येणाऱ्या अडचणी, त्यांच्यात निर्माण होणारी स्पर्धा व कामगारवर्गाचे अंधारात दिसणारे भवितव्य ही सर्व चिंतेची बाब आहे.

महिन्याभरापूर्वी  गुगल (Google) ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट (Alphabet) ने १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे कामगिरी खालावत असल्याचे कारण देत हे कर्मचारी काढण्यात आले.

या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणारी ॲमेझॉन, फेसबुकनंतर गुगल ही सर्वांत मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. गूगलने नवीन कामगिरी व्यवस्थापन प्रणाली योजना लागू केली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ज्यांची कामगिरी कमकुवत आहे अशा हजारो कर्मचाऱ्यांची निवड करण्यात त्याच्या व्यवस्थापकाला मदत होईल. गूगल व्यवस्थापक त्यांना बोनस किंवा स्टॉक अनुदान देण्यापासून रोखण्यासाठी याचा वापर करू शकतात.

या सोबतच मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान कंपनीनेही १०,००० कर्मचारी कपात केली होती. ॲमेझॉननेही १८,००० तर फेसबुकने ११,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

भारतासह जगभरात जानेवारी महिना रोजगाराच्या (Employment) दृष्टीने वाईट ठरला आहे आणि आता फेब्रुवारी महिन्यातही कामगार कपातीचे हे सावट कायम आहे.जगभरातील अनेक देशांवर मंदीचे (Financial Crisis) सावट दिसून येत आहे, ज्याचे गंभीर परिणाम कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहेत. 

जानेवारीमध्ये दररोज सरासरी ३,००० लोकांनी टेक कंपन्यांमधील (Tech Companies) आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यामुळं जागतिक आर्थिक संकट आणि मंदीच्या चिंतेमध्ये नोकरकपातीचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात १६६ टेक कंपन्यांनी ६५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची माहिती मिळत आहे.

मायक्रोसॉफ्टनेही काही दिवसांपूर्वी १०,००० लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याबाबत भाष्य केले होते. तर Amazon ने देखील १८,००० लोकांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यापैकी १००० कर्मचारी भारतात कार्यरत आहेत. २०२२ मध्ये, एक हजाराहून अधिक कंपन्यांनी १,५४,३३६ लोकांना कामावरून काढून टाकले आहे. शेअरचॅटने एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के म्हणजेच ५०० लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना आखली आहे.

विप्रोने खराब कामगिरीमुळे ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर सायबर सिक्युरिटी कंपनी Sophos ने भारतात ४५० लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. तर लिंकडीन (LinkedIn) ने लेऑफची योजना मांडली आहे. 

भारतात, एंड-टू-एंड डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म MediBuddy ने आपल्या ८ टक्के कर्मचारी किंवा सुमारे २०० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. स्विगीने ३८० लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. 

जगातील आर्थिक मंदीचा परिणाम तंत्रज्ञान कंपन्यांवर दिसून येत आहे. अ‍ॅमेझॉन, ट्विटर, फ्लिपकार्ट, फेसबुक, विप्रो, सिस्को यांसारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

अ‍ॅक्टिव्हिस्ट हेज फंडांनी बाजारातील प्रतिकूल व्यावसायिक परिस्थिती आणि खर्चात कपात करण्यासाठी कर्मचारी कमी करण्यासाठी गूगलवर दबाव आणला आहे. या निर्णयामुळे अजूनही अल्फाबेटच्या काही कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले जाऊ शकते असे कळून येत आहे. वार्षिक मूल्यमापनात कमी कामगिरीचे रेटिंग मिळालेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे हे ही कळून येत आहे.

मेटाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या १३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स, स्ट्राइप आणि ट्विटरही कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. सिस्कोही सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.

 ही कर्मचाऱ्यांची कपात करण्यामागे कंपन्या कारण असे सांगत आहेत की त्यांची मागील वर्षी कामगिरी चांगली नव्हती. त्यातील काहींना त्यांच्या बायोडाटा मधील कौशल्यांना साजेसा प्रोजेक्ट कंपनीत नसल्याने ते बरेच महिने रिकामे होते.(त्याला बेंच / बफर सिस्टम असे म्हणतात). त्यामुळे त्यांना दुसरा जॉब शोधायला सांगण्यात आला आणि राजीनामा देण्यास सांगितले. 

पगारवाढ नको पण कमीत कमी आम्हाला तरी कामावर कायम राहू द्या असे आता कर्मचाऱ्यांना म्हणण्याची पाळी आलेली आहे. एकूण अशी बिकट परिस्थिती सध्या आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर आली आहे. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.  

लेखन व माहिती संकलन:
Bharat Sonawane .
MBA - (Production & Operations Management.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...