कथा - झांबेरी..! सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका झांबेरी नावाच्या गावात भटकंती करत भटकतो आहे. तो कुठला तांडा, वस्ती, पाडा आहे हे कळायला मार्ग नाहीये. ठरवून असं सह्याद्रीच्या कुशीत आठ दहा कि.मी पायी भटकंती केली की मग मला अशी माझ्या ओळखीची माणसं भेटायला लागतात. पहाटे आठ पासून या डोंगरदर्यात भटकतो आहे. का भटकतो याला कारण नाहीये. पण; मनाला क्षणिक सुखाचा आनंद या अश्या भटकण्यातून भेटत असतो. म्हणून; हे असं भटकणं होत असतं अधूनमधून. झांबेरी तांडा, वस्ती, पाडा बघून आता या भर उन्हात माळावर येऊन बसलोय. इथे आलं की माझ्या डोळ्यांना गावच्या,गावातल्या कथा दिसू लागतात अन् मी त्यांना वाचू लागतो. दूरवर वाऱ्याची झुळूक तुटत असताना दिसत आहे, दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर लाल माती, मुरूम, दगडामातीचं हे रान डोळ्यांना नजरी पडत आहे. डोंगरात हिरवं गवत म्हणून जनावरांना चारायला काहीही नसल्यानं माळावर माझ्याखेरीच दुसरं कुणी नाहीये. दूरवर डोळ्यांना ओसाड दिसणारं माळरान, अंगाची लाहीलाही होऊन निघावी असा गरम शुष्क वारा अंगाला झोंबत आहे. वाळलेलं गवत, मोहरच्या तोंडाला काटा असलेला भासावा असं कुसळ या रानात आहे. ते अगदी स...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!