Holiday's Thought's..! सुट्टीचा दिवस निवांत असावं. दुपारची उन्हं खिडकीच्या अलीकडे येऊ लागली की काहीसं जीवावर करतच दुपारचं जेवण करायला म्हणून खानावळीच्या दिशेनं निघावं. रस्त्यानं भयंकर ट्रॅफिक, वाहनांचा धूर, माणसांची नकोशी वाटणारी गर्दी अन् घामाने मातकट झालेले चेहरे घेऊन खानावळीत येऊन बसावं. तुंबलेल्या सिंकमध्ये बघून श्र्वासावर नियंत्रण आणत सिंकसमोर असलेल्या शिंतोडे पडलेल्या आरश्यात बघून चेहरा, हात धुवून घेणं. सत्तरीच्या दशकातील या फळकटा असलेल्या खोलीवजा टपरीच्या खानावळीत एका अंगाला असलेल्या लाकडी टेबलला लागून असलेल्या खुर्चीवर बसून खानावळीतून येणाऱ्या बचकभर जेवणाची वाट बघत बसावं. कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या पोरांचं या खानावळीत जेवणं काय. समोर असलेल्या एका उंच ईमारतीच्या कामावर रोजंदारीने काम करणाऱ्या पोरांचं इथे जेवणं काय, सगळं सारखं आहे. समाजातील श्रीमंत, गरीब असं इथे काहीच नाही. तांब्याच्या ताट, वाटीत जेवायचं, चिल्लर चाळीस रुपये द्यायचे. उपरण्याला तोंड पुसत पुन्हा तांब्याच्या गिल्लासात खिश्यात दहा रुपये असेल गिल्लासभर थंड दही पिऊन घ्यायचं. खानावळीत जेवायला वाढून देणार...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!