रात्रीच्या साडे अकराच्या शिफ्टवरून त्याची सुट्टी झाली अन् औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून तो चेकआउट करून बाहेर पडला. नुकतच शिफ्ट सुटली असल्या कारणाने औद्योगिक वसाहतीतील रस्ते काही दहा पंधरा-मिनिटं आता शुष्क काट्याच्या झाडाप्रमाणे झालेल्या, सुखुन गेलेल्या माणसांच्या, तरुण पोरांच्या गर्दीने आता वाहणार होती.
दीड किलो वजनाचा पायात असलेला सेफ्टी शूज घालून तोही त्याचा फ्लॅट जवळ करत होता. आता पावसाची संततधार सुरू झाली होती. अजून फ्लॅटवर काहीतरी खायला म्हणून घ्यायचं होतं.
आतापर्यंत उंचपुऱ्या असलेल्या त्याच्या अंगावरील सदरा पाण्याने पूर्ण भिजला होता. रस्त्याच्या आडोश्याला लागून असलेल्या झाडांच्या अडुंगी पावसापासून स्वतःचा बचाव करत तो एकदाचा अकबर चाचाच्या अंडाभुर्जीच्या गाडीवर आला. एक फुल अंडाभुर्जी अन् दोन बॉईलचे पार्सल घेऊन तो फ्लॅटवर पोहचला फ्लॅट पार्टनर थर्ड शिफ्टसाठी म्हणून कंपनीत निघून गेला होता.
दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज पायातून काढत त्यानं सॉक्स पलंगावर उभ्यानेच फेकले. टॉवेलने डोकं पुसत तो बराचवेळ खिडकीतून बाहेर बघत बसला, पाऊस अजूनही बरसत होता. पन्हाळ्यातून पडणाऱ्या पाण्याचा वेग आता वाढला होता.
दूरवर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या भोंग्याचा आवाज कानी पडत होता. स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली आडोश्याला निजेलेल्या कुत्र्यांनी आपली कुस बदलून घेतली होती.
झाडांच्या फांद्या मंद हवेच्या झोतात हलत होत्या, रातराणीचा सुगंध या हळुवार हवेत त्याच्यापर्यंत येऊन जात होता. अन् उद्याची सुट्टी असल्याची त्याला जाणीव अन् या जाणिवेने हरखुन जात त्यानं फ्लॅटचा दरवाजा आतून लॉक केला आणि ओसाड माळरानातील कवी रुमीच्या कविता तो वाचत बसला.
तासाभराने डोळ्यावर आलेली झोप खोलीतील बल्ब त्यानं मंद उजेडाचा केला अन् त्याच्याच अंगाशी तो आता खेळू लागला होता कवितेत त्यानं काय वाचलं असावं माहीत नाही. रात्रीचा दोन अडीचचा प्रहर कधीच उलटून गेला होता. वाहणारा वारा आता शांत निवांत झाला होता, निर्धोक बरसणारा पाऊस आताश्या शांत झाला होता रातराणीचा सुगंध अधिक मादक अन् मंद भासू लागला होता.
बराचवेळ स्वतःच्या शरीराशी खेळून एकदाचा तो आता तृप्त झाला होता. सगळं कसं शांत भासावं असं झालं होतं अन् तो पलंगावर तसाच निवांत झोपून गेला होता.
तो जेव्हा पहाटे उठला दरवाजाच्याच्या कडीला दुधाची बॅग लावलेली होती. गॅलरीत वृत्तपत्र सर्वत्र मोकळे होऊन पसरलेले होते. विंडोग्रीलच्या आडून येणारा कोवळा सूर्यप्रकाश हवाहवासा वाटत होता. कित्येक दिवसांनी त्याला आज छान वाटत होतं.
आज दिवसभर काहीच नाही हाताशी असलेल्या पुस्तकांना वाचत बसायचं. दुपारी मेसला गेलं की जवळच असलेल्या लायब्ररीतून एखाद दोन पुस्तकं घेऊन यायची. अन् फार फारतर सायंकाळी जवळच असलेल्या युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात असलेल्या बाकड्यावर बसून एखादे पुस्तक हातावेगळे करायचं असे ठरले होते.
#Masterbution
क्रमशः
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा