गाव माझा..! पहाटेची थंडी आता दिवसेंदिवस वाढत आहे.जसजशी पहाट होते तसतशी पहाटेची साखर झोप आधिकच गडद होत जाते पण पहाटेच्या साखर झोपेसोबत सवयीच्या झालेल्या काही आवाजाने मात्र मन सभोवतालच्या वातावरणातील बदल अन् कानावर पडणारे सगळेच आवाज गोधडीत पडूनही कितीवेळ ऐकत बसलेलो असतो..! पूर्वेच्या दिशेने खिडकीच्या फटीतून येणारी सूर्याची कोवळी किरणं,पहाटेच्या कोवळ्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात रस्त्यावर निपचित पडलेली कुत्रे,पहाटेच उठून त्यांच्या पिलांची सुरू झालेली ओरडायची स्पर्धा.तारेवर भरलेली असंख्य पक्षांची शाळा,त्यांचं एक लईत ओरडत आसमंताला साद घालणं,बैलगाडीचा इतक्या पहाटे शेताकडे जातांना चाकाला लावलेल्या गुंघराचा येणारा आवाज..! मंदिरात उत्तरार्धकडे वळालेला काकडा,शेवटचा अभंग,शेवटची गवळण,शेवटची आरती,पसायदान,घंटेचा नाद,कपुरचा सुगंध,कपाळी लावलेला बुक्का,अष्टगंध,चंदन गंध,म्हाताऱ्या आजोबांचे पांढरे धोतर त्याला येणारा कस्तुरीचा सुगंध,अन् आजोबांच्या चेहऱ्यावर असलेले भक्तिभाव..! आजोबांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हरी भक्तित त्यांचं रमून जाणे अन् त्यांची ती इच्छा..! झाला शेवट हा गोड ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!