व्यथा कंत्राटी कामगारांच्या..! २ काल रात्री साडे अकराला कामाची शिफ्ट सुटली,कंपनीच्या गेटवर आलो तेव्हा जमिनीला साधळा लागेल असा पाऊस चालू होता.पुन्हा पाऊस वाढेल म्हणून अंधारातच धपाधप पावलं टाकत,जवळजवळ पळतच रस्त्यानं कामगार नगराच्या अन् माझ्या रुमच्या दिशेनं निघालो.एरवी हे रोजचं आहे,त्यामुळे याचं मला कुठलं सोयरसुतक नाही..! दोन-अडीच कीमीची धावपळ करून अखेर रूमवर पोहचलो,अंगावर शर्ट घामाने की हळूवार पडणाऱ्या पावसाने ओलाचिंब झाला हे काही समजलं नाही.मित्र तिसऱ्या शिफ्टसाठी कंपनीत निघून गेला होता,दरवाज्याला घातलेली कडी खोलली आणि आल्या-आल्या कॉटवर पडलो..! जीव दिवसभराच्या कामानंतर पार थकून गेला होता,पडल्या पडल्याच एका पायाने दुसऱ्या पायातील बुटाशी खेळ करून दोघांना काढले अन् पायानेच कॉटखाली लोटून दिले.सोक्स हाताने काढून गादीखाली खोचुन दिले अन् काही अर्धा तास निपचित पडून राहिलो,डोळे लावून शांत-शांत..! खिडकीच्या तावदनातून हळूवार निवांत गार वारा वाहत माझ्यापर्यंत येत होता अन् निपचित पडल्या जागी अंगाला गारवा झोंबत होता.गारव्याने अंगावर शहारे येऊ लागले होते,काही पंधरा-वीस मिनिटांनी जरासे ताज...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!