पूर्व वर्णद्वेषाची पदर उघडणी करणारी "द रूट्स..!"
ॲलेक्स हेले हा अमेरिकन लेखक ज्यांची १९७६ साली "द रूट्स" ही कादंबरी प्रकाशित झाली अन् अमेरिकन विश्वात एकच खळबळ माजली.
रूट्सने प्रत्येक एका विशिष्ट विचारसरणीची पार्श्वभूमी असलेल्या वाचकवर्गाला आवाहन केले अन् ही कादंबरी प्रत्येक एक स्वतंत्र विचारसरणी असलेल्या वाचकाच्या पसंतीस पडली.पुढे कित्येक वर्ष अन् आजही ही कादंबरी बेस्ट सेलर म्हणून कायमच चर्चेत राहिली आणि आजही आहे..!
आफ्रिकन,अमेरिकन वाचकांसाठी ही कादंबरी त्यांच्यासमोर त्यांच्याच पूर्वजांचा भूतकाळ मांडणारी ठरली,वर्णद्वेषाची कथा कादंबरीतील वास्तव कथेतून सांगणारे ही कादंबरी ठरली आणि अमेरिकन पूर्वजांच्या कुटुंबाच्या स्थलांतरन आणि त्या भूतकाळातील एक दुःखद पर्व सांगू बघणारी ही कादंबरी..!
पुढे कादंबरीबद्दल अनेक तारतम्य बाळगून अनेक वाद उफाळल्या गेले.परंतु हेलेच्या लेखन आणि संशोधनपद्धती आणि त्यांच्या कथनातील वस्तुस्थिती यामुळे या अश्या बळजबरीने उफाळून काढलेल्या वाद-विवादांचा कादंबरीच्या कामगिरीवर काही एक परिणाम झाला नाही..!
उलट "द रूट्स" या कादंबरीला आफ्रिकन आणि अमेरिकन इतिहासातील पौराणिक गाथा म्हणून बघितल्या जाऊ लागले.ज्यामध्ये गुलामगिरीत आफ्रिकन लोकांनी दुःख सहन केले आणि अमेरिकन समाजात त्यांच्या स्थानासाठी आफ्रिकन लोकांनी लढा दिला..!
त्यामुळेच आजही अमेरिकन साहित्य विश्वातील एक लोकप्रिय अभिजात कादंबरी म्हणून ही कायम आहे.जी की अत्यंत प्रभावशाली आणि लोकप्रिय अशी कादंबरी ठरली आहे..!
जाणून घेऊया लेखकाबद्दल:
११ ऑगस्ट १९२१ मध्ये हेलेचा न्यूयॉर्कस्थीत "इथाका" या ठिकाणी जन्म झाला.तो हेनिंग,टेनेसी या दोन्ही गावात मोठा झाला आणि पुढे त्यांचे कुटुंब स्थलांतरित झाल्यानंतरही एकट्याने आपले आपले काही आयुष्य त्यांनी याच ठिकाणी घालवले.हेलेची आई "बर्था" तो फक्त बारा वर्षांचा असताना वारली. हेलेचे वडील "सायमन" हे कृषी क्षेत्रातील सन्माननीय प्राध्यापक होते,ज्यांचे "द रूट्स" हे पुस्तक पूर्ण होण्यापूर्वीच निधन झाले..!
हेले शालेय जीवनात एक आपल्या विश्वात मग्न असणारा विद्यार्थी होता.शिक्षण झाल्यावर तो तटरक्षक दलात नोकरीस रुजू झाला.या काळात बऱ्यापैकी वाचन,लेखन चालू असल्याने त्यानं आपल्या स्वतःमध्ये लेखन करण्याची प्रतिभा आहे हे हेरले अन् मग त्याने विविध नियतकालिकांना छोट्यास्वरूपाचे लेख देण्यास सुरू केले..!
पुढे लेखनात त्याचे मन रमत गेले आणि वयाच्या सदतीसाव्या वर्षी त्याने नोकरी सोडली तेव्हा तो तटरक्षक दलाचा मुख्य पत्रकार झाला होता..!
नोकरी सोडल्यानंतरच्या आयुष्यात मग रोजच्या जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू झाला,अश्यातच एकदिवस हेलेला प्लेबॉयकडून "माईल्स डेव्हिस"ची मुलाखत घेण्यासाठी एक असाइनमेंट मिळाली,पहिलीच "प्लेबॉय मुलाखत" असल्यामुळे ती कुप्रसिद्ध म्हणावी अशी ठरली..!
त्यानंतर लवकरच,आफ्रिकी अमेरिकी मुस्लिम मंत्री व मानव आधिकार विषयाला घेऊन भाष्य करणारा कार्यकर्ता "माल्कम एक्स"सोबत त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तक लिहण्यास त्यानं मदत केली.जे की १९६५ मध्ये माल्कम एक्सच्या मृत्यूनंतर बेस्टसेलर पुस्तक बनले..!
माल्कम एक्सवरील पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर,हेलेने स्वतःच्या कौटुंबिक इतिहासावर संशोधन करण्यास सुरुवात केली.त्याने टॉम आणि आयरीन मरे,त्याच्या आजी-आजोबांची नावे शोधून काढली आणि आफ्रिकेत किंटे कुटुंबाची माहिती त्याने काढली अन् मग सुरू झाली लिखाणाला संपूर्ण बारा वर्षांचा कालावधी घेत, "द रूट्स" या जगप्रसिध्द कादंबरीला...!
"ओमोरो" आणि "बिंता किंटे" यांच्या मुलाच्या जन्मापासून "जफुरे" नावाच्या छोट्या आफ्रिकन गावात रूट्स या पुस्तकाची सुरुवात होते.त्याचे प्रसिद्ध आजोबा "कैराबा कुंता किंटे"यांच्या सन्मानार्थ त्या जन्म झालेल्या मुलाचे नाव "कुंता किंटे" ठेवण्यात येते.तोच ज्याने "जफुरे" या गावच्या लोकांना भीषण दुष्काळाच्या सावटातून वाचवले..!
वयाच्या पाचव्या वर्षी कुंता दुसऱ्या काफोमध्ये पदवीधर होतो आणि तो शेळ्या पाळतो.वयाच्या दहाव्यावर्षी,कुंता आपले शालेय शिक्षण पूर्ण करतो आणि आपल्या सोबत्यांसोबत पुरुषत्वाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जातो.
ते प्रशिक्षण घेऊन आला की त्याला त्याची स्वतःची झोपडी मिळते तो स्वतःच्या झोपडीत जातो आणि पुढे चालून स्वतःची जमीन शेती करण्यासाठी मिळवतो.एके दिवशी,ड्रम बनवण्याच्या लाकडाच्या शोधार्थ फिरत असताना, कुंता पांढर्या गुलामांद्वारे (अमेरिकन खलाशी) पकडला जातो,ज्यांना "टोबोब" म्हणतात..!
पुढे महाकाय जहाजामध्ये युनायटेड स्टेट्सच्या लांबच्या प्रवासात पकडलेल्या कुंटाला आणि डझनभर इतर त्यांच्याच गाव सभोवतालच्या पुरुषांसह जहाजाच्या कोठडीत बांधून ठेवतात.संपूर्ण महासागर ओलांडून आणि अतिशय त्रासदायक प्रवास केल्यानंतर,कुंता आणि वाचलेले स्त्री-पुरुष यांना घेऊन जहाज व्हर्जिनियाला पोहोचते.त्यावेळी कुंता त्यांच्या सुटके साठीचा कट रचतो..!
उपासमारीने बेहाल झालेला कुंता अंगात ताकद येताच तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो.परंतु तो पकडला जातो. तो पुन्हा पुन्हा असं तीन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न करतो.चौथ्या प्रयत्नात त्याला पकडणाऱ्या दोन पांढऱ्या खलाश्यांनी त्याचा एक पाय अर्धा कापुन टाकला.त्यामुळे तो देहभान गमावतो आणि स्वत: ला नवीन कल्पना विश्वात शोधत राहतो.प्रचंड मार, घाण आणि उपासमार अशा छळ छावणीत कुंटा किंटे सापडलेला असतो.
बोटीतून पूर्ण प्रवासभर हे छळ सुरूच असतात.त्यातून सुटायचे अनेक योजना होतात.परंतु अपयश आलं तर मृत्यू अटळ असतो...!
अश्या परिस्थितही तो जीवंत राहतो,तगदा राहून अनेक महिन्यांनी कुंटा दुसऱ्या देशात पोहोचतो.आणि एका श्रीमंत माणसाकडून विकत घेतला जातो.या श्रीमंत मालकांना 'मासा' असं आदराने बोललं जातं असत.मासा आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा या गुलामांचा वापर करत असत,कष्टाचे कामे त्यांच्याकडून करून घेत असत.हे लोकं असे अनेक गुलाम आपल्या पदरी बाळगून असत,ज्यामुळे की त्यांची श्रीमंती गणली जात असत..!
या पकडून आणलेल्या गुलामांकडून शेती कसून घेणे,प्राणी पाळणे,बागा,मळे फुलवणे,स्त्री गुलामांना मुलं सांभाळणे,स्वयंपाक-पाणी,स्वच्छता,शिवणटिपण आणि असे कामे दैनंदिन जीवनात करावी लागत असत..!
वर्षा मागून वर्षे सरत राहतात आणि आता कुंटा किंटे त्याची मातृभाषा आफ्रिकन 'मंडीका' ही भाषा सोडून टॅबूबची भाषाही शिकून गेलेला असतो.'मंडीका' भाषेतील काही शब्द सतत उजळणी करून मनात तो जिवंत ठेवत असतो.स्वतःच्या देशातली मातृभाषा त्याला मनात जिवंत ठेवायची असते अन् यासाठी त्याचा आटापिटा चालूच असतो..!
सतराव्या वर्षी गुलाम झालेला कुंटा आता ३७ वर्षांचा झालेला असतो.जिथे गुलामगिरी करत असतो तिथल्याच 'बेल' नावाच्या चाळीस वर्षाच्या स्त्री गुलामाशी तो लग्न करतो.
यथावकाश त्याला मुलगी होते,तिचे नाव तो 'किझी' ठेवतो.
किझीला घेऊन फिरतांना कुंटा तिला अनेक 'मंडीका' शब्द शिकवतो.त्याच्या 'जफर' खेड्यातल्या घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगतो.कुंटाचं बालपण कसं गेलं,तो कसा शिकला,त्याचं कुटुंबीय वगैरे सगळं सांगत राहतो..!
"किझी" जशी तारुण्यात पदार्पण करते तशी एका आफ्रिकन गुलामाला पळून जाण्यासाठी मदत करतांना पकडली जाते.आता 'मासा' शिक्षा म्हणून तिला विकून टाकतो.तिची आणि कुंटा यांची ताटातुट होते.पुढे किझीला मुलगा होतो. त्याला ती 'जफर' मधल्या कुंटाविषयी सांगते जे जे तिला कुंटा किंटे ने सांगितलेले असते..!
त्या मुलाला पुढे मुलं होतात आणि प्रत्येक पिढी कुंटाच्या बालपणापासून ते वर्तमान काळापर्यंत सगळ्या गोष्टी नवीन पिढीला सांगत जाते.थोडक्यात कादंबरीचा नायक कुंटा किंटे याच्या अनेक पिढ्यांची कहाणी उलगडणारी ही कादंबरी आहे..!
किझी चा मुलगा जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळतं.ते कसं मिळतं तेही खूप रंजक आहे,त्यासाठी आपल्याला ही कादंबरी ववाचायला हवी.शेवटी अशाच कुंटाच्या पुढच्या-पुढच्या पिढीतल्या एका मुलीला मुलगा होतो तो कोण हे रहस्य कादंबरी वाचल्यावर कळेलच..!
कुंटाच्या वाट्याला आयुष्यभर जी गुलामगिरी आली तिच गुलामगिरी लक्षावधी आफ्रिकन वंशाच्या लोकांच्याही वाट्याला आली.अॅलेक्स हॅलेने त्यांचा आवाज या कादंबरीच्या माध्यमातून जगापुढे आणला आहे..!
Reference:
James Baldwin.
Varnita.
Written by:
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा