मुख्य सामग्रीवर वगळा

व्यथा कंत्राटी कामगारांच्या..!

व्यथा कंत्राटी कामगारांच्या..!

पहाटेचे सहा वाजले की कामगार चौक कामगारांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो.आयुष्यभर औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे कंत्राटी कामगार वयाने चाळीशीच्या आतचेच असतात सगळेच..!

कारण नियमाप्रमाणे वयाच्या ३० वर्षा पर्यंतच कुठल्याही कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामगार काम करू शकतो असा नियम आहे.परंतु कामातील ईमानदारी,सातत्य आणि कंत्राटाशी असलेलं सौख्य त्यामुळं या बिचाऱ्या कामगारांच्या आयुष्यातील दोन-चार वर्ष इकडं तिकडं होतात अन् बिचाऱ्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था होते...!

औद्योगिक क्रांती झाली पण वसाहतीत काम करणाऱ्या या कामगारांचे प्रश्न आजवर सुटले नाही हे दुःख बोचणारे आहे.अन् ; हे तेव्हाच कळते जेव्हा आपण त्यांच्या वंशाला जातो किंवा त्यांच्या संगतीने काम करतो..!

पूर्वी आपल्यात असलेलं कौशल्य,मेहनतीची तयारी हेरून आपल्याला या कामात नियमित केलं जात असायचं,आता बराच सुशिक्षित वर्गही कंत्राटी पद्धतीने काम करतो,पर्याय नाहीये बेकारी वाढली आहे.
गावाकडची बापजाद्याने पोटाला चिमटा घेऊन पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली जमीनही किती दिवस किती लोकांचं पोट भरणार म्हणून तांडेच्या तांडे शहराच्या वस्तीला येऊन बसले..!

इतक्या सात-आठ दशकात काहीएक बदल झालेला नाहीये फक्त गावची तांडा म्हणून ओळखली जाणारी वस्ती शहराच्या वस्तीला आले अन् त्यांचे नाव बदलून कामगार नगर झालं एक हक्काची पाटी चौकात त्यांच्या नावाने लागली..!

काम बदलली पण जसा घाण्याला वेळ बघून बैल जूपावा तसं घड्याळाच्या काट्यावर कंपनीत माणसं जुपली जात आहेत.देवानं पोट दिलंय,भूक दिलीय म्हणून हे सगळं करावं लागतं.नाहीतर हे सगळं सोप्पं नाही..!

अन्; लईच अंगावर कधी आलं तर शहराच्या एकांगी अंगाला असलेल्या रेल्वे पट्टीवर झोपून रहायचं अन् जीवन साजरं करायचं इतकंच काम असतं.कारण कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अश्या लोकांच्या आयुष्यभराच्या एक पट्टीत राहून सुरू असणाऱ्या कथा संपणाऱ्या नाहीये..!

इतकंच कधीतरी उंच-उंच इमारती अन् ही चकचकीत दुनिया बघून जीवाला काही क्षणांचा विसावा मिळतो म्हणून माझ्यासारखी कित्येक जण इथे तग धरून आहे.नाहीतर गावाकडे शेताच्या बांधावर आंब्याच्या नाहीतर बोडक्या झालेल्या बाभळीच्या झाडाला फाशी घेणं असो काय अन् इथे एखाद्या यंत्रात हात घालून आयुष्यभराचं अधूपण घेऊन मिरवणे काय अन् रेल्वे पट्टीवर झोपून जीव देणं काय सारखंच आहे...!

माणसाची जगण्याशी स्पर्धा निर्माण झाली अन् माणूस आयुष्य जगायचं सोडून त्या स्पर्धेच्या खेळातच खेळत राहिला.शंभरात एखादा जिंकला बाकी सगळे हळूहळू मरत,हरत राहिले.बस इतकी सोप्पी आयुष्य जगण्याची गणितं आपण माणसाने करून टाकली आहे..!

तर सकाळ होती कामगार चौक कामगारांनी फुलून गेलेला असतो कुणी रिक्षाने,कुणी कंपनीच्या बसने,कुणी तिघात तिघे सख्खे भाऊ भासावे असं सौख्य निर्माण करून एकाच्या जुन्या दुचाकीवरून गेली कित्येक वर्ष कंपनीत जात आहे..!

त्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही,फक्त कामाने रापलेला चेहरा दिवसेंदिवस रापतच राहिला,एखाद्याची तब्येत सुटून पोट पुढे आलं तर एखादा काम करून करून पार खंगून गेला.एक बदल इतकाच झाला पाच-सहा सेफ्टी बुटांचे जोड घासून घासून बदली झाली उभ्या आयुष्यभरात.
होय पाच-सहाच कारण दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट असतो तो नीट वापरला तर कित्येक दिवस जातो..!

कंपनीत काम करायचं म्हणजे अश्या कंत्राटी कामगारांना तितकाच विरंगुळा म्हणून तंबाखूचं व्यसन असतं.कंपनीत आत न्यायला बंदी असली तरी सेफ्टी बुटाच्या आतमध्ये टाकून घेऊन जातात की ही माणसं.सुपरवायझर तरी काय करल तो उभे आयुष्य हे काम करून कंटाळला असतो...!

दोन-चार सालची गोष्ट आमचा सुपरवायझर रात्रीची नाईट शिफ्ट करत होता सारी पोरं कामाला लावली त्यानं कँटीनपाशी येऊन धाडकन खाली कोसळला घाटीत जास्तोवर या जगण्यातून मुक्त झाला होता बिच्चारा.उंचापुरा आर्मीत जवान नसावा इतका भारी होता तब्येतीने पण गेला..!

पहाटेच्या साडे-सहापर्यंत कंपनीच्या गेटवर येईपर्यंत बऱ्याच गप्पा चालतात या कंत्राटी कामगारांच्या एकमेकांशी,एकदा गेटच्या आत गेलं की मग फक्त काम चालतं अन् माणूस ते करत राहतो.मुतायला जायचं म्हंटल तरी सावड राहत नाही मग बोलणं तर अवघडच आहे..!

औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचं जगणं कसं असतं सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर...
औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या गेटवर कधी बघितली असेल तर एक कँटीन नावाची टपरीवजा दुकान असते बस तिचं चालणं ज्या पद्धतीचं असतं,तिथला चहा घेतल्यावर जे काही वाटतं अन जेव्हा हफ्त्यातून रविवारी ती बंद असली की तिच्या बंद असलेल्या सापळ्याकडं बघायचं बस जे काही वाटतं तसंच या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचं जगणं असतं..!

बाकी सांगेल नंतर कधीतरी..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...