सांजेचा किनारा..! उतरत्या दुपारच्या सोबतीने उगवत्या सांजेची सोनेरी किरणे डोळ्यात साठवत किनाऱ्याने कितीवेळ चालत राहणे.समुद्रातील खारटपणा वाऱ्याच्या अधून-मधून येणाऱ्या झोताने जाणवायचा तितकाच काही क्षणांपूर्ता अंगाशी आलेला चिडचिडेपणा,विचारांची मनाशी लागलेली तंद्री विभक्त होवुन कितीवेळ त्या सागराला न्याहाळत फक्त अन् फक्त चालत राहणं... हातात काही नाहीये आलेला क्षण अथांग पसरलेल्या किनाऱ्यावर समुद्रातल्या पाण्याने धडकत राहतो,कितीवेळ त्याला न्याहाळणे.परतीच्या पाण्यासोबत माझ्या विचारांचे पुन्हा एकदा समुद्रात निरंतर वाहून जाणे बस इतकेच... सांज ढळून येते,एरवी मनुष्य वस्तीपासून सागर किनाऱ्यावर बसायला एकांत कुठे भेटल शोधत शोधत खूप दूरवर येऊन पोचलेलो असतो,आता मनाचीच खोटी समज घालून एकांत व वाऱ्याचे निवांत वाहणाऱ्या झुळकेचे लोट अनुभवत किनाऱ्यावर मातीत पाय रोवून बसून घेणं. पुढे अथांग सागर आहे,एकांत आहे,वाऱ्याची झुळूक आहे आता मी एकांत शोधतोय.तो भेटल न भेटल पण सागरात कितीवेळ नजर लावून दूरवर नावड्यांचा चालू असलेला मासोळी पकडण्याचा जीवनमरणाचा खेळ अनुभवयास मिळतो आहे... छान आहे एकूण विस्तीर्ण पसर...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!