आयुष्याची गणितं..! पहाटेच्या कुडकुडणाऱ्या थंडीचा प्रवास दुपारच्या सुमारास,साधारण बाराच्या ठोक्याला रांनवाटेला अनवाणी पायांना तापलेल्या मातीच्या फुफाट्यात सावलीच्या आधाराने पावलांना सावरत-सावरत चालत राहायचं... सावलीत पावलांना सावरणे असतेच,पण नशीबाला आलेला कडक उन्हाचा पारा काही आयुष्यभर सोबत न सोडणारा असतो.उपरण्याने जितकं होईल तितकं सावरत जिथवर उन्हाच्या झळाया डोळ्यांना दिसतात,तिथवर सीमा ठरवून चालतं व्हायचं,कश्यासाठी चालतो आहे माहीत नाही किंवा याला उत्तरही शोधायचं नसतं... एका अंगाला परतीच्या वाटेचा खापरीचा रस्ता दिसतो,अर्धवट वाहत्या पाण्याने भरलेला,गुळगुळीत झालेल्या दगड धोंड्यांचा नितळ,पारदर्शी वाहत्या पाण्याचा चेहऱ्यावर ते थंडगार पाणी घेऊन बकर्याच्या खुरांनी रस्त्याची मोकळी झालेली मुतरट वासाची मातड,मातीचा फुफाटी चेहऱ्यावर अनुभवायला येते. ती खसाखसा हातानी घासून धुवून टाकायची नायतर,रात्रीची झोप ती येऊन देत नाय अन् सारे गाल टराटर उलून अंगाला झोंबायला लागते ... एकूण हिवाळ्याच्या दिवसात हा गाव रहाटीचा जगण्याचा तोरा काही अलगच आहे,असतो.साल दर साल परसाकडच्या मुंज्याला बोनं ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!