Mindset..!
गेले काही दिवस एक अनामिक हुरहूर लागून असते,आयुष्याच्या किंवा वयाच्या या टप्प्यावर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत असेल असेही वाटून जाते आहे.इथून पुढे मी जे काही पोस्टमध्ये लिहणार आहे,त्या बाबतीत अलीकडे मी खूप विचार केला अन् आज नकळत अस्वस्थाच्या दाटलेल्या वेळी हे लिहायला घेतले..!
आयुष्यात आपल्याला काय हवं आहे..? आणि काय नको आहे..? याची वजाबाकी,बेरीज आपण आयुष्यभर जगत असताना करत असतो.आपलं संपूर्ण आयुष्य भटकंती करत,आपल्याला अपेक्षित जे काही क्षण आहे ते मिळवण्यासठी आयुष्यभर आपण वणवण करत असतो.जन्म ते मृत्यू या रोलर कॉस्टरमधील अदभुत अनुभव देणाऱ्या प्रवासातील अनेक वळणांच्या या रस्त्यावर हे सर्व क्षण आपल्याला अनुभवता येत असतं..!
या प्रवासात अनेक वळणं येतात,अनेकदा आपण कोलमडून जातो तर अनेकदा आपण इतक्या एका उंचीच्या ठिकाणी जावून पोहचतो की,काहीही करायचे असते अश्यावेळी तो इतरांचे काय हा इतरवेळी पहिले येणारा विचार आपल्या मनात अश्यावेळी येत नाही.तो आपण करायला सोडून देतो (माझ्याबाबतीत असं होवू शकत नाही)...
तर गेली दोन वर्ष आयुष्यातील अस्वस्थतेचा काळ अनुभवतो आहे,म्हणजे यातील तिसरी अवस्था अनुभवतो आहे.ज्यात माणसांची अवस्था ही पूर्णपणे घड्याळातील दोलकाप्रमाणे झालेली असते.
तारुण्य,तारुण्यातील या प्रवासात सर करायला हवे आहे असे काही माईल स्टोन प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.यातील अनेक सर केलेले आहेत आणि अनेक खूप टफ आहेत सर करण्यासाठी,अलिकडच्या काळात ते सर करतांना होणारी माझी वाईट अवस्था बघितली की माझी वेळोवेळी होणारी,झालेली अवस्था असते ती खूप वाईट आहे..!
मान्य आहे वेळ थांबली आहे..!
होय वेळ कुणासाठी थांबत नाही परंतु गेले दोन वर्ष माझ्यासाठी ती थांबली आहे..!
आयुष्याचं गणित जुळवता जुळवता आयुष्याची बसलेली घडी विस्कटायला नको इतपत अलिकडे मनाची अस्वस्थता वाढली आहे,इतपत आयुष्यात वेळ थांबली आहे...!
अस्वस्थतेेचे हे बोल अनेकदा अनेकांना बोलायला नको वाटतात पण माझ्यासाठी (कारण,हा प्रवास माझा आहे.) क्षण बोलण्यातून,लेखणीतून ते व्यक्त करणं हे मला या काळात नॉर्मल राहण्यासाठी मदत करते,म्हणून वेळोवळी हे असं लेखणीतून मोकळं होत असतो..!
अलिकडे आवड म्हणून काही गोष्टी जवळ केल्या अन् त्यात आलेलं यश आयुष्याच्या या टप्प्यावर सर करायला हवे असणारे जे माईलस्टोन आहे,त्यांना अलिकडे हुलकावण्या देत आहे असे वाटून जात आहे.
इथे या माझ्या दुसऱ्या विश्वात,अलिकडे मला खूप सेफ वाटते आहे.कारण इथे कुणाशी तशी स्पर्धा नाही किंवा "स्पर्धा" हा शब्दच या दुनियेत नाही.त्यामुळं इथे अलिकडे मन रमायला लागलं आहे येथील माणसांचा सहवास हवाहवासा वाटू लागला आहे..!
अनेक क्षेत्रांमध्ये आपलं नाव असलेली उंचीचे व्यक्तिमत्व इथे जोडल्या गेली,त्यांचा वेळोवेळी संवादातून त्यांच्या लेखणीतून मैत्रीची ही बाग दिवसेंदिवस फुलत गेली,वाढत गेली.त्यांच्याकडून खऱ्याखुर्या माझ्या रोलरकॉस्टरच्या वळणावळणाच्या प्रवासात खूप मार्गदर्शन मिळत गेलं,जे खूप हवेहवेसे वाटले.त्यांचा सहवास हवहवासा वाटला..!
मी ज्या वाटेवरून यापूर्वी चाललो त्या वाटेवरून या वाटेवर येतानाच अन् आता काही सुखद क्षण देऊन जाणारे अनुभव गाठीला येऊ लागले आहे,तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकतंय,काहीतरी राहून जातंय याची जाणीव होते अन् ती अलिकडे अस्वस्थ करायला लागली आहे मला..!
त्यामुळे हा प्रवास थोडा गांभीर्याने घेतो आहे,म्हणजे होतं असं की मला या आयुष्यात आलेल्या व्यक्तींना गमवायचे नाहीये.कारण नंतर मग सर्व मिळवूनही ते नसतील तर उभी हयात जाईल पण त्या व्यक्ती पुन्हा भेटणार नाही अन् भेटल्या तर एक ती अढी त्यांच्या मनात काय माझ्याविषय त्यांच्या मनात राहून जाईल...
म्हणून थोडे सावरत हा प्रवास करतोय,अलिकडे या गणिताला अजून सोप्पं करून टाकलं आहे की स्पर्धेच्या युगात आपल्याला जे माईलस्टोन गाठायचे आहे त्यांना वेळ असताच लवकर गाठण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे..!
"आयुष्यात सर्व बाबतीत सेट होणे" या थांब्यावर काही दिवस आपला प्रवास थांबवायचा पण या दोन्हींमध्ये जे अंतर आहे त्यात मी टिकतो कितपत हे खूप महत्त्वाचं आहे अन् अलिकडे त्यात स्पर्धा,माझ्या या विश्वातील माणसांना सोबत घेऊन चालणे हे थोडं अवघड होवू लागलं आहे..!
बघू काय होतं,उद्देश प्रामाणिक आहे पण काय होईल ते सांगता येत नाहीये...!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा