एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!
खिडकी पल्ल्याड असलेल्या जगाला अलिकडे कित्येकदा निरखून बघत असतो.जसं मन अस्तित्वाच्या शोधार्थ भटकंती करायला लागलं आहे तसे हे खिडकी पल्ल्याड असलेलं जग खिडकीतून न्याहाळत असताना मला छान वाटायला लागलं आहे..!
कुणाच्या आयुष्यात खूप सर्व उजेड असल्यानं त्याचं आयुष्य खूप सुखाचे क्षण देऊ करणारं किवा प्रकाशमान झालेलं मला भासू लागलं आहे. सोबतच अनेकांच्या आयुष्यात ठरलेला तो कायमचा अंधार आणि काळोखात माखलेले त्यांचे आयुष्य बघितलं की,आयुष्याला घेऊन आपण उगाच अनेक नको त्या अपेक्षा करत बसतो याची प्रचिती होते..!
अलीकडे खिडकीत बसून अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकाग्र चित्ताने बसलं की आपोआपच सुटतात,त्यामुळं हे विंडोग्रीलच्या आधाराला बसून बाहेरचं जग न्याहाळणे आवडायला लागले आहे मला हल्ली..!
खूपवेळा विंडोग्रीलच्या आधाराला बसून असले की,अश्या काळोखाच्या रात्री स्ट्रीटलाईटच्या उजेडाखाली आयुष्य जगणारी माणसं मला खूप आवडतात.ते त्यांचे जीवन एका स्वतंत्र आयुष्यात जगत असतात,स्वतंत्र म्हणजे असे एकाच वेळी दोन आयुष्य,एक दाखवण्याचं अन् एक त्यांच्या विचारात विचार करत आपल्याच कोशात रममाण राहून जगत असलेलं आयुष्य...!
ही माणसं आयुष्याला घेऊन फार Positive नसतात पण एखाद्या गोष्टीचा लागलेला ध्यास त्यांना स्वस्त बसू देत नसतो,मग दिवसातील बराच वेळ त्या गोष्टीसाठी ते विचार करत असतात..!
खूपवेळा ठरवून अश्या माणसांना भेटायचा प्रयत्न केला.दिवसा ही माणसं क्वचितच बोलतात पण जसं काळोख होवू लागतो,तसे ही माणसे आपल्या मनातील चालू असलेले विचार किंवा आपलं दुसरे आयुष्य कुणी जाणून घ्यावं म्हणून प्रयत्न करत असतात..!
त्यांना अशी व्यक्ती फार सहज मिळत नाही,म्हणून ते काळोखात बसून आपल्याशीच बडबडत आपली आपल्या आयुष्याची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज स्वतः करून गणितं सोडवत राहतात.गणितं ती असता तरी कोणती,एकाचवेळी दोन आयुष्याची अन् सोबतच कित्येक माणसांची...!
कित्येकदा ठरवून बोलायचं ठरवतो अश्या या एकाकी आयुष्य झालेल्या माणसांना.परंतु त्यांनी मला रोजच जेव्हा काळोखात विंडोग्रीलच्या आधाराला बसून बाहेरचं जग न्याहाळताना पाहिलं होतं,तेव्हा त्यांनी केलेलं ते भेसुरी हास्य बघून माझ्या जीवाचा थरकाप झालेला..!
हे सर्व आठवून आपणही एका वेळी दोन आयुष्य जगतो,हे कोडं त्यांना सुटलं की काय..?
हा प्रश्न पडला म्हणून अलिकडे त्यांचा सहवास टाळतो आहे..!
पण मी सांगितल्याप्रमाणे या एकावेळी दोन आयुष्य जगणाऱ्या लोकांना जसा अंधार प्रिय असतो अन् प्रकाश नको असतो अन् काळोखात ज्याप्रमाणे या माणसांना आपलं ऐकून घेणारे कुणी हवं असतं अश्यावेळी मी त्यांना बोलावं असंही मला वाटतं..!
त्यांनाही वाटत असेल पण आम्ही एकाच वेळी दोन आयुष्य जगणारी माणसं जे आम्हाला दोघांना कळून चुकलं आहे,तेव्हा काळोखात काय बोलू आम्ही..!
म्हणून मग मी विंडोग्रीलच्या आधाराला बसून स्ट्रीट लाईटच्या उजेडात आपलं आयुष्य शोधणारी माणसं बघत बसतो..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा