मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य आणि क्युबिकल..!

आयुष्य आणि क्युबिकल..!

पावसाच्या अधूनमधून रिमझीम सरी कोसळत आहे,शहरावर धुक्यांची शाल पांघरली गेली आहे,संपूर्ण शहर धुकमय झालं आहे,आकाशातील ढगांना हात लावून अनुभवता येतंय,सोबतीला गुलाबी थंडीचा गारवाही अनुभवतोय यातच माझ्या नशिबाने मला मिळालेलं आसपासच्या हाकेच्या अंतरावर मिळालेलं निसर्ग सौंदर्य जे डोळ्यात कित्येकवेळा साठवूनही माझी भूक क्षमली नाहीये..!

कुणाला कसली भूक असते तर कुणाला कसली आमचा बाबतीत आम्हाला अश्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनसोक्त जगायला हवं असतं,बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा हे जग अनुभवलं..!

मी नेहमीच म्हणत असतो,शहराच्या चकमकीच्या फ्लेक्सच्या दुनियेत, ऑफिसच्या क्युबिकल्समध्ये आपण आपलं जगणं बंदिस्त करून घेतलं आहे.खरच आपण निसर्गाशी संवाद साधायला अन् त्याच्याशी एकरूप व्हायला विसरलो आहे..!

आपला प्रवास कधीचाच उलट्या दिशेने सुरू व्हायला हवा होता पण अजूनही कुणीतरी दुसरा तिसरा व्यक्ती शहर की और चलो..! चा नारा देतो आणि आपल्या गावाच्या प्रती,निसर्गाच्या प्रती जाग्या झालेल्या जाणिवा जाग्या होण्या आधीच मारून टाकतो आहे..!

व्यवहार कुणाला चुकत नाही ते आपल्यालाही चुकणार नाहीये त्यामुळे त्यांच्या शहर की और चलो..! या नाऱ्यात ही काही चुकीचं नाहीये.आपलं मन असो किंवा आता जगाच्या पाठीवर राज्य गाजवणाऱ्या आपल्या ज्या दोन पिढ्या आहे त्या,नेहमीच द्विधा मनस्थितीत जगत आल्या आहे.
अन् यातली पहिली पिढी आयुष्याचा शेवटचा काळ आता मोजत आहे.परंतु तरीही अजूनही ही पिढी द्विधा मनस्थिती सोबत घेऊन जगते आहे,पहिल्या पिढीचे भवितव्य संपूर्णपणे बरबाद झालं आहे...

या तरुण पिढीच्या हाताला सर्व आहे पण काही गोष्टी केव्हाच हातच्या हातून निसटून गेल्या आहे.कितीही मनाला वाटत असले तरीही एकोप्याची ही जाणीव अन् क्युबिकल्समध्ये बंदिस्त झालेलं आपलं उर्वरित आयुष्य आपल्याला त्या एका बाजूनं निर्णय घेऊ देणार नाहीये.कारण आता माणसं यंत्रवत झाली माणसांच्या मनावर यंत्राने ताबा मिळवला आहे..!
हे निसर्गाला केव्हाच कळून चुकलं आहे,त्यामुळे तो आपल्याला दूर करतोय अलिकडे त्याच्यापासून..!

उगाच थोरोला निसर्गाच्या सान्निध्यात आपलं उर्वरित जीवन जगण्याचे डोहाळे लागले नाही.तो काळाच्या,वेळेच्या खूप पुढे होता अन् त्यावेळी निसर्गाशी एकरूप राहून आपलं जीवन जगण्यात अर्थ आहे हे ज्यांनी हेरले ते क्युबिकल्समध्ये बंदिस्त न राहता आजही एका त्या उंचीच्या ठिकाणी आहेत..!
जिथवर जगावर राज्य गाजवणाऱ्या आजच्या या दोन पिढ्या सर्व काही असूनही जावू शकत नाहीये..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...