मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॅनव्हास

#Backspace. कित्येक बॅकस्पेस घेऊन खूप प्रयत्नांनी काहीतरी लिहले आहे खूप वेळा पुन्हा पुन्हा आपणच आपले लिहलेले वाचत राहावे,एकवेळ अशी येते लिहलेले निरर्थक,चुकीचे आहे असे वाटते. मग पुन्हा तेच रिपीट-रिपीट लिहत राहायचं बॅकस्पेस देत राहायचे... विचारांचे गणित जेव्हा जुळत नाहीना तेव्हा ही अवस्था होते,सोप्पे गणिते अवघड होऊन बसतात.स्वप्न सत्यात उत्रवणे जितके अवघड तितकेच विचारांचे गणित जुळवणे आहे. खूप दिवस झाले ऐकलंय तू कॅनव्हासवर काही मुक्तपणे उधळण केली नाहीये,मग वाट कसली बघत आहेस यार उधळून द्यायचे रंग मुक्तपणे,उधळण करून साकारले तर माझी तू विचारी कॅप्चर केलेली छबी त्यावर साकारली जाईल. नाहीतर... मी ऐकलंय ब्लॅकवर व्हाईट छान दिसते,फक्त त्याला किती पसरवायचं हे आपल्याला उमगले पाहिजे मग काळोखातसुद्धा एखादा पांढराशुभ्र तुझा मुखवटा कॅनव्हासवर साकारला जाईल नाही का..? एक सांगू ऐकणार असेल तर... कॅनव्हास दुसरी संधी देतो,पर्याय देतो ज्यात काहीतरी सुंदर साकारले जाते...पण ना..! बॅकस्पेस देऊन केलेलं लेखन फक्त प्रश्न देतं त्याला उत्तरे नसतात,मग पुन्हा पुन्हा तेच वाचायचं तिथच चुकायच,तडफडत राहायचं स्वप्...

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_क्षेत्र...

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_क्षेत्र... #भाग_एक. महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर नव्याने ओळखले जात आहे.औरंगाबाद शहरात अनेक नवीन प्रकल्प आलेत,काही प्रकल्प काही कारणास्तव येऊ शकली नाहीत. तो भाग वेगळा... या काळात बराच रोजगार या शहरात औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमधून उपलब्ध झाला... औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि शेंद्रा (एमआयडीसी) ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या.  औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे,परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...

प्रवास निसर्गाच्या सानिध्यात..!

 #प्रवास_निसर्गाच्या_सानिध्यात..! #औरंगाबाद_ते_पालघर... कोकण विभाग आणि त्या बाजुस कोकण विभागास जोडून असलेले काही शहर,गावे म्हणजे स्वर्ग..! कोकण म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवतो तो समुद्रकिनारा,होड्या,माडाची उंच-उंच झाडे,भरघोस पडणारा पाऊस अन् तेथील स्थानिक संस्कृती,पाककला,कोकण किनाऱ्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य,आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे कोकणचा दर्यादील माणूस..! रात्रीच्या साडेबारा वाजता औरंगाबाद येथून सुरू झालेला माझा प्रवास अजूनही चालू होता.सकाळची सहा वाजलेले अजूनही सर्वदूर अंधार त्यात हिवाळा असल्या कारणाने थंडीने रात्रभर कुडकुडत होते...पुन्हा एकदा चहा पिण्यासाठी म्हणून आमची गाडी थांबली अन् आपण कुठे आहोत हे जेव्हा मी मित्राला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, भाई स्वर्गात पोहचलो आहोत..! स्वर्गात म्हणजे नेमके काय..?  म्हणून मी गाडीच्या बाहेर आलो आणि समोर तो आसपास असलेला निसर्ग,उंच-उंच झाडे,धुके अन् या सर्वात समोर काही अंतरावर एका टपरीमध्ये चुलीवर तयार होणारा चहा मला दिसला.रस्त्यावर चहुकडे धुके आणि या धुक्यात मला फक्त ती एक छोटीशी चहाची टपरी अन् आमची गाडी याश...

#HashtagMe...

 #HashtagMe... कधीतरी काळोख आपलासा वाटतो,कॅनव्हासवर अधुरे राहीलेले चित्र पूर्ण झालेल्या चित्रापेक्षा आवडू लागते...गवंड्याकडून प्रोपर सोयीची करून घेतलेली माझी बेडरूम मला आवडत नाही,फर्निचरवाल्याकडून कित्येक डिझाइन बघुन सलेक्ट केलेलं काचेच बुकशेल्फ नकोसं वाटतं त्यातील कोऱ्या करकरीत एकही पान न दुमडलेल्या कित्येक कादंबऱ्या मला नकोश्या वाटतात.... आपल्या सभोवताली असलेल्या या रोजच्या वापरात,हाताळण्यात येणाऱ्या वस्तूंचे किती झालो असतो नाही का आपण..?  कधीतरी त्याही आपल्याला जेव्हा नकोश्या वाटू लागतात तेव्हा मात्र समजून जायचे आपल्या आत असलेलं नैराश्य हे वाढत आहे... एकवेळ असते आपण आपल्याच माणसांना इग्नोर करू लागतो कारण काहीच नसते एकांत,आपली हवी असणारी उत्तरे जी इतरांकडे नसतात.मनाची लहान बाळासारखी खोटी समज घालायची अन् अपेक्षित उत्तर भेटले आहे आपल्याला आपल्याकडूनच म्हणून तितक्यावेळ डोळ्यातील पाण्याला सावरत बसायचं... समाधान झालेलं नसते खूप अती झालंय असे वाटू लागले की,ही आपली माणसे आपोआप आपण सोडून देतो.आपली बेडरूम आपल्याला प्रिय वाटायला लागते,बुकशेल्फ मधील कादंबऱ्या वाचून संपू लाग...

छोटे सरकार अन् त्यांची सवंगडी...

कथा-छोटे सरकार अन् त्याची सवंगडी... भाग-एक ते दहा. सूर्योदय केव्हाच झाला होता,चुलीवरच पाणी इसन घेण्या इतपत तापलं होतं. मायची अंघोळ झाली अन् मायनं मधल्या घरातून आवाज दिला,छोटे सरकार उठ की...!आता बकऱ्याच दूध काढायचं हायसा,बकऱ्या घेऊन रानात जायचं हायसा..! उठ रं लेका,चंल उठ..! गोड गुणाचं हाय माझं ते लेकरू उठ चल...! आवर बिगी.. बीगी..! मला बी जयवंता काकुच्या वावरात सरकी निंदाया जायचं हाय..! मोहरच्या घरात राच्या भांड्याचा गराडा पडला हायसा..! मायचं बोलणं ऐकुन तावा-तावात मी ताडकन अंगावरची गोधडी पायाने लोटून देत उठलो... परसदरच्या चुल्हंगणावर ठेवलेलं गरम पाण्याचे घमीलं मोरीत आणून पितळीच्या बादलीत टाकलं.पाच मिनिटात पाणी तांब्यानी साऱ्या अंगावर घेऊन अंघोळ केली अन् मधल्या घरात कपडे बदलून मायकडे गेलो ... मायनं चुलीवर कोरा चहा ठेवला होता अन् तो पार उकळून उकळून साऱ्या घरात त्याचा उकळायचा सुगंध पसरला... मी कंगव्याने मोठे झालेल्या केसांचा भांग पाडत मायकडे कप,बशी,चाळणी घेऊन गेलो,आये मला बटर खायचे दोंड रुपये दे..! आईला पैसे मागितले, माय हसत हसत मला म्हणाली, छोटे सरकार..तुम्ही मोठे झ...