वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन रामा कुंडूर एक बाजूला गिलास, डेचकी ठेवून उख्खड बसून बिड्या फुकीत त्याचा धूर वरती काळीकुट्ट पळती ढगाड बघत त्या दिशेनं सोडीत, बसून गप्पा झोडीत होता. जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर उख्खड बसून त्यांच्या गप्पाच्या तालावर तंबाखू मळीत होता. तंबाखू मळून झाली तसं तो संतू आण्णा तलाठीकडे बघत म्हंटला, ओ सरकारी जावई घेताय का व्ह आयतावयता मळून दिलेला तंबाखुचा विडा..! अन् ; संतू आण्णानं झोपल्या जागीच हात लांबवत तो विडा एक चुटकीत पकडला अन् ओठाखाली टाईट दाबून धरत बसल्या जागीच एका हाताच्या डोपरावर एका अंगाला होत सडकीवर जोरात पीक हानली..! मग गावच्या गप्पा सुरू झाल्या, तिशीच्या संतू अाण्णा मावळजे ते संतू आण्णा तलाठी इथ पर्यंतचा प्रवास संतू आण्णा रामा अन् जगण्याला सांगू लागले. गावची बारबापी लोकं कोण, कोण सरकारी कामात दखलंदाजी करतो. गावचा सरपंच कसा आहे, तो कसा त्याच्या कारभारणी पुढं बैल होवून वागतो हे सगळं जगण्या अ्न रामा एकमेकांना बघत सांगू लागले..! गावची शाळा, शाळामास्तर, जुना तलाठी, आठ दिवसाला येणारा ग्रामसेवक. ग्राम पंचायतीची इमारत पावसाळ्यात गळतीला लागल्य...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!