West Minister Bridge च्या नोंदी क्र ३ आज पहाटेच तुझा वायरलेस फोन आला अन् तू म्हणाली की अरे मी नऊ महिन्यांची पोटूशी आहे..! पण तू बघतोयना जगात किती अस्थिरता माजली आहे, जिकडे पहावे तिकडे युद्ध सुरू आहे, मी माझ्या बाळाला जन्म देऊ की नको अरे, लष्करात असलेला माझा पती इस्राईल सैन्याच्या सोबतीने गेले दोन–चार महिने बेफिकीर होऊन लढतो आहे. गाझा पट्टीवर पुन्हा एकदा झालेल्या बाँबबारीमध्ये एक सहा महिन्याचे बाळ पोटूशी घेऊन धावत असलेल्या एका आईला एका सैनिकाने गोळी घालून ठार केलं..! अन् नंतर त्या सैनिकाच्या आतील बाप जागा झाला म्हणून त्यानं त्या बाळाला न मारता तसे तिथंच एकटं सोडून दिलं, ते बाळ साध रांगतही नाही रे ते तिथेच पडून होतं. नंतर कुण्या पान्हा फुटलेल्या गाझा पोलिशीन बाईने त्याला स्तनाशी धरलं अन् ऐकणं ते बाळ रडायचं शांत झालं होतं, दूध पित होतं. या सगळ्यात त्याच्या आईनं काय केलं असावं, तिचं थडगं तिथंच पडून होतं. आठ दहा दिवसांपूर्वी वायरलेस कॉलवर पतीशी बोलत असताना त्याने त्याच्या युद्धाच्या रोजच्या कहाण्या सांगितल्या, आज हे घडलं ते घडलं इतकी माणसं मरण पावली, इस्राईल आता त्याल...
इंडस्ट्रीयल काहीबाही..! आज रविवार पहाटे जरा लवकरच उठलो. शेविंग क्रीम आणि जिलेटगार्डने घरीच घोटून दाढी केली. औद्योगिक वसाहतीत कंपन्यात काम करायचो तेव्हा हॉस्टेलला राहत असताना मित्र म्हणायचा एकविशीचा नवतरुण आहेस तू घरी का दाढी करतो ? मस्त पार्लरला जायचं वगैरे, पण; दाढी,कटिंगसाठी पार्लर जाऊन शेपन्नास घालणं मला, माझ्या विचारांना कधी जुमानले नाही. मग आपलं हे असं सुरू राहिलं आजतागायत, हा गुण कोणाकडून आला माहीत नाही. कारण वडिलांनी कधी घरी दाढी केली नाही की आजोबांनीही नाही. पण; आपलं हे जे काही आहे ते छान वाटतं. दोन पैसे वाचतात, भंगाराच्या दुकानात गेलं की इतक्या पैश्यात ओळखीचा भंगारवाला दोन पुस्तकं देऊ करतो. नाहीतर दैनंदिन एखाद दिवशीचा वेगळा खर्च वाचून जातो. अंघोळ वगैरे करून बराचवेळ बाल्कनीत खेळत असलेल्या वृत्तपत्राला घेऊन वाचत बसलो. सूर्याची किरणं तोवर बाल्कनीशी स्पर्धा करू लागली होती. नारळाच्या झाडाच्या असलेल्या झावळ्या अन् पहाटेच्या कोवळ्या सूर्य किरणांची स्पर्धा सुरू होती भिंतीवर पहिले येऊन कोण विसावेल यासाठी. दहाचा पार कलला तसं कामगार नगराच्या चौकात थोडं भटकून यावं म्हणून ...