#windowblinds.. #daughtersday...#special... सांजेचा पडता पाऊस त्याला खूप वेळ विंडोग्रील मधून आपले ते बघत राहणे,हे अनुभवणे गेले काही दिवस खूप खूप आवडायला लागले आहे...कितीवेळ मग खिडकीच्या काचेवर ओघळणाऱ्या थेंबांना टिपत बसायचं,कॉफी मग हातात घेऊन कल्पनेत कुठेतरी स्वार होऊन यायचं,डोळ्यांना मात्र समोर दिसणारं सुखच अनुभवायचं असते... ते टिपत राहतात पडणाऱ्या पावसाच्या सरींना तर कधी मग आपसुकच डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांना... पावसाच्या सरींना सोबत घेऊन दिवसाची होणारी सुरुवात,घरात एकाच वेळी वाढणाऱ्या आजी,आई,नात,यांची पिढी अन् सोबतीला संस्कारी आजोबा,अन् बाबा हे सर्व आहेच पण यांच्या सोयीने,सोयीचं,सवयीचं झालेलं ते घर..! घर घडवते आपल्याला आणि आपल्या सोबत आपल्याच पुढील पिढ्यांना.मग ते भिंतीवर रेघोट्या ओढत काढलेली पहिली बार्बी डॉल असो किंवा आई-बाबा हे सगळं त्या भिंतीवर उमटते,पुढे तारुण्यात मनाचे विस्तारलेले विचार हवीहवीशी ओढ अन् मग या सगळ्यात पावसाच्या साक्षीने आपण घरातील खिडकीच्या कधी प्रेमात पडतो समजत नाही.. कितीवेळ विंडोग्रील मधून तो पाऊस अनुभवणे,मग कधीतरी त्या आकाशी कलरच्या पडद्या आडून घरा...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!