मृत्यू अन् त्याच्या संगतीचा कथा..! अंतिमसंस्कारचे सर्व विधी उरकून घराकडे वळलो पंधरा दिवस या काळात सरून गेले होते,आयुष्यात आयुष्याला घेऊन आता भूतकाळ अन् वर्तमानकाळ यांच्यासोबत प्रत्येक वाक्याला जोडून बघत होतो.येणारा काळ खूप कसोटीचा अन् आयुष्यातून एकतर मी उठून जाईल,नाहीतर मी त्या अवस्थेत तगून राहील अन् मरणाला कारण न होता जगत राहील असं काही मनात चालू होतं. आयुष्याला घेऊन इतका विचार त्या दिवसापूर्वी किंवा त्या एका घटकेत केला तितका कदाचित आजवरही केला नसेल..! घरी आलो घर ओळखीचे पण दिशा अनोळखी वाटू लागल्या होत्या,डाळिंबाच्या झाडाची पानगळ सुरू असल्यानं साऱ्याच अंगणात वाळलेल्या पानांचा सडा पडलेला होता.धूनी-भांडी करत असलेल्या ठिकाणची माती पोपडे धरू बघत होती,जसं तिलाही आता इथला सहवास नकोसा झाला होता. कोणाचं जाणं आयुष्यात इतकं रितेपण घेऊन येईल हे स्विकारण्याची ती पहिलीच वेळ होती अन् ते मनाला न झेपणारे होते..! सर्वच कसं शांत-शांत भासत होते,दुपारचं रणरणते ऊन हवेहवेसे वाटू लागले होते,आयुष्यात इतकी शांतता यावी की पक्षांनीसुद्धा आपल्या जवळपास फिरकू नये.कधीतरी विटांना मातीत रचलेल्या वॉलकंपाऊं...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!