अंत एका भाषेचा,अंत एका संस्कृतीचा..! अंत एका भाषेचा,एका संस्कृतीचा..! काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता..? काय करत होता..?कसं आयुष्य जगत होता..? त्याचं राहणीमान कसं होतं..? हे आपल्याला काही माहीत नाही..! अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते..! मूळात त्याला मानव जातीचा राग,तिटकारा होता किंवा कदाचित भितीसुद्धा वाटत असेल.कारण त्याच्या जमातीतील,त्याच्या रक्ताच्या नात्यातील माणसांना व्यवहारी व्यवस्थेचं भूत मानगुटीवर बाळगलेल्या आपल्यातल्याच काही व्यवहारी माणसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा अंत केला अन् शेवटी हा एकटाच उरला..! २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात,अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला.परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं.तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!