रेल लाईन अन् प्रवास..! पुणे मागं पडलं अन् झेलम एक्सप्रेस तिच्या मर्यादित वेगानं चालू लागली, आता आठ तास मी निवांत होतो. रात्रीचे दहा वाजले होते, दौंडच्या जवळपास रेल्वे रुळावर चालत होती. वेळीच तिकीट काढलं असल्याने, जनरलचं तिकीट खिश्यात घेऊन मी स्लीपर कोचमध्ये मला जागा शोधत होतो. म्हटलं नशीब आजमावून बघूया भेटली जागा तर प्रवास सुखाचा होईल पण; तसले काही चिन्हं दिसत नव्हते. अन् मी काही तोंडानं जागा द्या..! असं प्रवाश्यांना म्हणणार नव्हतो, जरी रेल्वे संपूर्ण मोकळी होती. मलाही कारण हवं होतं. शेवटी दोन डब्ब्यांना जोडणाऱ्या जागेमध्ये मी डब्याच्या दरवाच्याजवळ बसून प्रवास सुरू केला. छान वातावरण होतं, झेलम एक्सप्रेस मला आवडण्याचं कारण होतं की ती माणसाला तिच्या धावण्याचं जीवावर येईल इतकीही जोरात धावत नाही. की, इतकंही हळुवार चालत नाही की आपण झोप येऊन तिथेच पेंगुळलेल्या अवस्थेत झोपून राहू. ती तिचं चालत होती ठरलेल्या स्टेशनवर प्रवाश्यांना तिच्या आत भरून घेत होती. अधून मधून चहा, जेवणाचे कंटेनर, इतर तत्सम पदार्थ, वॉटर बॉटल विकणारे विक्रेते येत होते. रेल्वेचा प्रवास नवा असला तरी आता बरीच ओळख य...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!