मुख्य सामग्रीवर वगळा

"परका" - "अवधूत डोंगरे"

"परका" - "अवधूत डोंगरे"


गेले चार पाच दिवस वेळ भेटेल तसं "आल्बेर काम्यू" यांच्या "द आऊटसायडर" या कादंबरीचा "अवधूत डोंगरे" यांनी केलेला मराठी अनुवाद "परका" वाचत होतो. 

खूप सुंदर अन् लेखकाचं आयुष्याला गूढ वलय प्राप्त असल्यासारखं आयुष्य, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सामान्य लोकांना रोजच्या व्यवहारात जन्म, मृत्यू या गोष्टींचं असलेलं सोयरसूतुक अन् लेखकाला या गोष्टींचं कुठलंही नसलेलं आकर्षण यामुळं आल्बेर काम्यू पहिल्या काही समासातच जवळचा वाटला अन् हे पुस्तकही जवळचं वाटलं. 

आल्बेर काम्यूसारखं एक वेगळं आयुष्य जगणारे माणसं पृथ्वीतलावर विरळच असतील. त्यांनी आयुष्यात काय केलं, किंवा लोकं काय म्हणतील हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही. एकाकी राहून आयुष्य जगणं, एक आगळेवेगळे नकळत आयुष्याला वळण देऊन आयुष्य जगणं यात सुखून आहे. अन् हे गेली काही वर्ष मी अनुभवतो आहे, त्यामुळं आल्बेर काम्यूचं हे जगणं अन् त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला खूप पसंतीस पडला.

आपल्या कमाईमधून आपण आईला खुश नाही ठेऊ शकत म्हणून तिला वृद्ध आश्रमात ठेवणारा, आईच्या अंतिम संस्काराला गेलेला पण तिच्या जाण्याचं त्याला कुठलंही न झालेलं दुःख किंव्हा त्याच्या राहणीमानातून तसं दिसून येणे. आईचा अंतिमविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या प्रिय मैत्रिणी बरोबर चित्रपट बघायला जाणारा, तिच्या समवेत समुद्र किनाऱ्यावर जाणारा अन् अजून बरच काही यामुळे आल्बेर काम्यू वेगळा वाटला. तो खास लक्षात राहतो ते त्याच्या गूढ जगण्यामूळे.

अवधूत डोंगरे यांनी केलेला अनुवादही छान झाला आहे.
थोडक्यात पुस्तकाबद्दल,
आल्बेर काम्यू यांची ही कादंबरी फ्रेंच भाषेत "ले त्रांज" १९४२ साली भाषांतरित झाली, इंग्रजीत "द आऊटसायडर" म्हणून तिचं भाषांतर झालं अन् १९५७ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेली ही कादंबरी. ही कादंबरी आजही वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्ष झाली असली तरी आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थाना वाव देणारी ठरत आहे.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...