मुख्य सामग्रीवर वगळा

"सुखन"

"सुखन"


लेखिका, कवयित्री, ब्लाॅगर आणि एक सह्रदयी व्यक्तीमत्व असलेल्या "तन्वी अमित" यांचं "सुखन" हे ललित गद्य प्रकारातील पुस्तक ३० नोव्हेंबरला मला मनस्वी, सप्रेम भेट मिळाले. "आर्ष पब्लिकेशन्स, पुणे" यांनी प्रकाशित केलेले "१४४" पृष्ठसंख्या असलेलं हे सुंदर असं पुस्तक.

साधारण जानेवारीमध्ये कुठल्याश्या दोन दिवसांच्या उसवत्या सांजवेळी हे पुस्तक मी वाचून संपवलं. परंतू वेळेअभावी या पुस्तकाबद्दल लिहायला काही जमत नव्हतं, अखेरीस काल सायंकाळी वेळ काढून हे असं लिहायला घेतलं अन् लिहत राह्यलो.

खरंतर मी काय लिहतो मला माहित नाही. ते ना धड पुस्तक परीक्षण ठरेल किंवा ना धड पुस्तक अभिप्राय. पण मनात आलं की आपण ह्या पुस्तकाबद्दल लिहायला हवं अन् लिहायला घेतलं.

पुस्तक येण्यापूर्वी पुस्तकाची वाट मी बघतच होतो. पुस्तक जेव्हा हातात पडले तेव्हा प्रथमतः तर मला पुस्तकाची हार्डबाउंड, हार्डकव्हर रुपात केलेली बांधणी खूप आवडली. जी पुस्तकाची शोभा वाढवते. मला स्वतःला हार्डबाउंड, हार्डकव्हर स्वरूपातील पुस्तके खूप आवडत असल्याने, हे पुस्तक नेहमीच अजूनच अधिकच जवळचे वाटणारे असेल.

थोडक्यात पुस्तकाबद्दल ;

लेखिका, कवयित्री, ब्लाॅगर आणि एक सह्रदयी व्यक्तीमत्व असलेल्या "तन्वी अमित" यांचे हे ललित गद्य प्रकारातील पुस्तक "सुखन" माझ्या हाती पडले अन् पुढे कित्येक दिवस ते माझ्या बुकशेल्फशी खेळत राहिलं. कारण हेच की पुस्तकाचं खूप सुंदर असलेलं मुखपृष्ठ.

प्रेम करायला शिकवणारी भाषा व उर्दू भाषेतील, गोडवा, लहेजा, अदब यामुळे उर्दू भाषा त्यातील शेरो शायरी मला पसंत होतीच अन् कित्येकदा वाचनाच्या माध्यमातून मी ती शिकण्याचा, आधिकाआधिक जाणून, समजून घेण्याचाही प्रयत्न करत असतो.
ही संधी मला पुन्हा नव्याने "तन्वी अमित" यांच्या "सुखन" माध्यमातून मिळाली. 

या ललित गद्य प्रकारातील पुस्तकांतून एकाचवेळी आपल्याला  जिंदगी गुलजार है..! च्या माध्यमातून गुलजार भेटत असतात, माहलका चंदा भेटत असते, जावेद अख्तर, साहिल सहरी नैनीताली, कफिल आजर अमरोहवी, कैफी आझमी, गुलाम रब्बानी ताबाॅ, निदा फाजली, जौन एलिया, मेहंदी हसन, आशुफ्ता चंगेजी अश्या अनेक शायर अन् गझलकरांचे लेखन, शेरो शायरी आपल्याला या पुस्तकातून वाचायला भेटते.

हे सगळं कधीतरी आपल्या आयुष्यातील आठवणींचा पट उलगडत, त्याच्याशी जुळवून घेत लेखिका "तन्वी अमित" या शायरीशी जोडू बघतात. अन् ललित माध्यमातून ते लिखित आपल्या समोर त्या मांडतात.

मग त्यातून कधीतरी उलगडत जाणारा त्यांचा भूतकाळ असो किंवा लेखिकेचा भविष्यकाळ, वर्तमानकाळ शेरो शायरी, गझल लिहून आपल्या समोर ज्यांनी आपली उभी हयात लिखित स्वरूपात ठेवली ते हे शायर, गझलकार यांचं आयुष्य आपल्याला "तन्वी अमित" या उर्दू भाषेचा आधार घेत शेरो-शायरीच्या माध्यमातून त्यास ललित लेखनाची जोड देत सोबतीने त्यांच्या आयुष्यातील काही घटनांचे खुलासे देत आपल्या समोर मांडू बघतात.
जे काही हे सर्व खूप सुहृदय असं काहीसं वाटणारं आहे.

यामुळेच हे पुस्तक हळूवार खुलत जाते अन् आपण त्याला समजून घेत वाचत राहतो. आपण वाचत राहतो अन् आपल्याला भेटत राहता वरील सर्व शायर, गझलकार,लेखिका "तन्वी अमित" यांचं उर्दू शायरी, भाषेप्रतीचं प्रेम अन् खूप काही..!

"तन्वी अमित" यांचं सुखन मधील उर्दू भाषेला जोडून केलेलं ललित लेखन हे खूप सुहृदय अन् संवेदनशील, काळजाचा ठाव घेणारं असं आहे. इथे अनेकवेळा त्यांच्या लेखणीतून आपल्या माणसांप्रती, आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांप्रती त्यांचं मन शायरीचा आधार घेत जेव्हा हे ललित लेखन करतं तेव्हा कुठेतरी हळवेपणाची लकेर त्यांच्या लिखाणात येते अन् हेच त्यांच्या लिखाणाला उजवं ठरवते.

त्यांचं ललित गद्य प्रकारातील हे पुस्तक शायरीला जोडून केलेल्या प्रगल्भ विचारांच्या विचारसरणीने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार, त्यांच्या संवेदनशील,हळव्या मनाची लकेर, छटा त्यांच्या लिखाणातून वेळोवेळी दिसून येते.

उर्दू भाषेप्रती असलेली जवळीक, गोडवा अन् तन्वी अमित यांचं लेखन उर्दू अन् शायरी, त्यांचं त्यांना उजवं ठरवणारं ललित अश्या एकूण सर्व गोष्टींना एकत्रित घेऊन त्यांनी केलेलं हे ललित गद्य शायरीपर लेखन उर्दू भाषेच्या नवख्या चाहता वर्गाला एक नवीन समंजस पायवाट देतं आणि एक छानशी भेट "सुखन" माध्यमातून देत आहे..

Written by, 
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...