मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भटकंती With Gautala Wildlife Sanctuary..! 💙

भटकंती With Gautala Wildlife Sanctuary..! 💙 गेले दोन दिवस एकापाठोपाठ सुट्टया असल्यानं अन् आता आज सोमवारी पण सुट्टी असल्याने बरेच दिवस एकांताशी स्वगत करून, मनात चालू असलेल्या असंख्य घडामोडींना थोडा रिलीफ द्यावा म्हणून कित्येक दिवस निसर्ग जवळ करायचा विचार करत होतो. दोन दिवसांपूर्वी अखेर हा योग जुळून आला. मला निसर्गात एकटं भटकायला भयंकर आवडते, नशिबानं मी राहतो ते शहर निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. अन्; शहराच्या चहूबाजूंनी रानोमाळ भटकत राहता येईल असे कीत्येक डोंगरं-टेकड्या आहे. निसर्गानं आमच्यावर निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. त्यामुळे हा निसर्ग सोडून बाहेर भटकायला जावं असे वाटत नाही, जरी या डोंगरातील रानवाटा ओळखीच्या झाल्या आहेत. जरी डोंगराच्या कपारीला वास्तव्य करणाऱ्या बांधवांना आम्ही ओळखीचं झालो आहे. कारण हेच की, या निसर्गाशी नेहमीच एकरूप होऊन आम्ही राहत आलो आहे. अन् त्याच्याशी एक नाळ कायम जोडली आहे. आमची दररोजची पहाट याच गौताळा अभयारण्यात भटकत सुरू होते. अन्; सध्या नशिबानं माझी सायंकाळसुद्धा याच अभयारण्यात भटकंती करायला, फिरायला येऊन ह...

महाराष्ट्र एक्सप्रेस..!

महाराष्ट्र एक्सप्रेस..! सात वाजेची महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येण्याची अनौंनसिंग झाली तसे मी हातातला दहा रुपयाचा कोथिंबीर घातलेला वडापाव जो एरवी मी आठ-दहा घासांत खातो, तो तीन घासांत मी नरड्याच्याखाली नेऊन सोडला. दुसऱ्या घासाला अर्धी हिरवी मिरची जिभेवर कतरली तशी ती जिभेला इतकी झोंबली की, एखादं महुळ एखाद्या लहानग्या पोराला झोंबावं अन् ते पोर पिंडरीला पाय लाऊन सैरावैरा पळत सुटावे. मी गटगट करून रेल मीलची पाण्याची अर्धी बाटली खाली केली, धावतच माझी बॅग घेऊन जनरलचा डब्बा जवळ केला. पुढच्या मिनिटभरात रेल्वेला सिग्नल मिळाला अन् रेल्वे एक-एक रुळ ओलांडत तिच्या नेहमीच्या मार्गाला लागली. स्टेशनवरला उजेड, आवाज जसजसं रेल्वे स्टेशनपासून दूर जाऊ लागली तसतसे अंधारात रेल्वे रुळावर चालत राहिली अन् एक वेळ आली तसे स्टेशनवर असलेल्या लोकांचा गलका, लोकांच्या हाका, मागे अंधारात विरत गेल्या. अन् ; मला खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सची आठवण येऊन गेली. दाटीवाटीत कसाबसा उभे राहून प्रवास सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी एकादशी म्हणून डब्ब्यात बरेच वारकरी बांधव राम कृष्ण हरीचा घोष करत होते...

कंत्राटी कामगार..!

कंत्राटी कामगार..! काही वेळापूर्वी फ्लॅटवर येऊन निपचित पडलो आहे. डोक्यावर असलेला फॅन कमी स्पीडमध्ये गरगर आवाज करत फिरतोय, विंडोग्रीलमधून येणारी वाऱ्याची झुळूक हवीहवीशी वाटत आहे. पण; मग शरीर सुखाची मागणी करेल म्हणून निपचित लोळत पडलो आहे.  आज दिवसभर शहरात कारण नसतांना भटकत होतो. मित्र गावाला गेला आहे मग त्याची बाईक माझ्या जवळच आहे, शंभरचं पेट्रोल टाकून दिवसभर या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर असं भटकत राहिलो. कारण काहीही नव्हतं बस कंपनीच्या गेटवर गेलं की, तेथील सुखलेले कंत्राटी कामगारांचे चेहरे बघितले की मला माझ्यासारखं कुणीतरी आयुष्य जगते आहे याची जाणीव होते. अन्; मग जीवाला काहीवेळ सुख भेटून जातं. या असल्या जगण्यात कसलं आलंय सुख, पण; आपल्यासोबत ही फरफट कुणीतरी अनुभवत आहे हे काळजाला आधार देऊन जातं. नाहीतर एरवी आम्हा कंत्राटी कामगारांच्या आयुष्याची फरफट सुरूच असते.  जसं कंडोम वापरून दहा-पाच मिनिटांची हौस भागवून झाली की, त्याला पहाटे कुठल्या रस्त्यावर फेकून दिलं जातं. तसंच अगदी तसंच कंपनीत सहा महिन्यांचा करार संपला की आम्हाला फेकून दिलं जातं. असंच परवा एका मित्...

सहेला रे..!

सहेला रे..! काही आठवणींना आठवांचा दरवळ असतो, अशीच ही एक सुगंधी आठवण. आज पुन्हा प्रवासात विचार करत असताना सिग्नल लागला अन् मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आठवांच्या कुप्पीतून त्या गोड आठवणीला अलगद सामोरे घेऊन आले. असंच एकदा पुण्यातील मोशी येथील Exhibition साठी रात्री अकरा-बाराच्या दरम्यान औरंगाबादवरून निघालो. तेव्हा मी एका छोट्या कंपनीत सिनियर प्रॉडक्शन सुपरवायझर या हुद्द्यावर काम करत होतो. प्रवास सुरू झाला आकाशात असलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशाच्या साक्षीने प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर, कंपनीचे हौशी मालक, मी अन् अजून काही कंपनीतील मित्र असे आम्ही प्रवास करत होतो.  कुठल्याश्या टोलनाक्यावर गाडी थांबली अन् रात्रीच्या तीन- साडेतीन वाजेच्या वेळी एक विशीतली तरुणी रातराणीच्या फुलांचा गजरा घेऊन आमच्या होंडासिटी कारकडे आली. ती फुलं विकणारी तरुणी कदाचित स्वतःच्या जागेतील तिने लावलेली फुलं विकत नसावी. कारण काही दहा-पंधरा मिनिटांपूर्वीच तिची ही गजऱ्याची टोपली तिनं उघडली असावी असं वाटत होतं. अन् ही रेडीमेड तयार गजरे तिला विकत कुठून भेटत असावी असंही वाटून गेलं. ड्रायव्हर अन् ती तरुणी य...

स्वगत मनाचे..!

स्वगत मनाचे..! पाऊस निर्धोक होऊन विजांच्या कडकडाटासह पन्हाळातून बरसतोय, मगाशीच काळोखात हरवून जावी तशी संपूर्ण शहराची लाईट एकदमच गेली अन् एकदमच सारं शहर अंधारून गेलं. काही वेळापूर्वी सेकंड शिफ्टची सुट्टी आज लवकरच घेऊन कंपनीतून आलो. ओले झालेले सेफ्टी शूज खिडकीच्या ग्रीलला लेसने बांधून टाकले अन् सॉक्स दरवाज्याच्या लॅचला अटकवून बेडवर पडून राहिलो. मित्र आज त्यांची थर्ड शिफ्ट असल्यानं केव्हाच कंपनीत निघून गेली असतील. कारण बरसणारा पाऊस अन् त्याचा अंदाज घेऊन आज ड्युटी करावी लागेल, याचा अंदाज आज पहाटे उत्तरेच्या दिशेने भरून आलेल्या आभाळाला बघूनच आला होता. मी दुपारसरल्या जेव्हा कंपनीत गेलो तेव्हा अंदाज वाटत होता की, गरजत असलेली ढग बरसणार नाही. पण; उलट झालं अन् आता मगा एक तासापासून विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस चालू आहे. आल्यावर पन्हाळ्यातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या तालावर सकाळी मित्राने चहा प्यायला गेला, तेव्हा आणलेला पेपर कितीवेळ वाचत बसलो. आता एकट्याला जेवायला काय करू.? या एका अस्सल गृहीणीसारख्या मला पडणाऱ्या प्रश्नाला मी येताना उत्तर शोधले अन् तीन अंडी काळ्या पिशवीत पेपरात ब...

कॅनॉट कॉर्नर ..!

कॅनॉट कॉर्नर ..! दोन दिवस सलग पाऊस पडल्यामुळे काळवंडलेल्या ढगांच्या आडून काही केल्या सूर्याचं दर्शन झालं नाही. या काळात दिड कीलो वजनाचे सेफ्टी बुट पाण्यात भिजल्याने दोन कीलोचे वाटू लागले होते.  आमच्यासारख्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना पावसाचे काही सोयरसुतक नसते, तो येवो न येवो काही एक घेणंदेणं आम्हाला नसतं. बस अट एकच कंपनीत जायच्या वेळी अन् यायच्या वेळी तो यायला नको. नाहीतर गेले दोन दिवस जी बुटांची झालेली अवस्था अन् त्यांना ओढूनताणून वापरताना कंपनीत माझी झालेली खराब हालत हे वाईट्ट आहे. अखेर आज दुपारी सूर्याने दर्शन दिलं, ओझरते का होईना सूर्याचे किरण आमच्या उबट वास येणाऱ्या फ्लॅटमध्ये आले. माझी गोधडी सादळल्याने उबट वास मारत असल्यानं दुपारी तिला भर उन्हात गॅलरीत टाकून दिली अन् दोन दिवसांचे चार सॉक्सचे जोड धुवून वाळू घातले. अन्; सोबतच बुटही स्वच्छ करून मस्त पॉलीश करून चकचकीत करून गॅलरीत उन्हं खायला ठेऊन दिली. स्लीपर घालून खाली फ्लॅट मालकाच्या मुलीला तिने दिलेली पुस्तकं परत केली आणि मग कॉफीसोबत तिच्याशी बऱ्याच गप्पा "ऑक्टोबर जंक्शन" या पुस्तकाला ...

पुस्तकांचा दरवळ सवे मैत्रिणीच्या..!

पुस्तकांचा दरवळ सवे मैत्रिणीच्या..! जून्या पुस्तकांचा दरवळ अन्; हे पुस्तकं बघत असतांना आपल्या सोबतच मैत्रिणीच्या डोळ्यांत असलेलं कुतूहल. जून्या पुस्तकांना स्मृतींचा दरवळ असतो कधीही न उलगडणारा. मग अंदाज लावले जातात पुस्तकांवर सोडून दिलेल्या कित्येक खाणाखुणांना घेऊन, कधीतरी हे अंदाज जुळून येतात. नाहीतर न जुळलेल्या या अंदाजांना घेऊन आपण उलगडत राहतो कित्येक दिवस, त्याच न उलगडणाऱ्या अंदाजांना पुस्तकांत गिरवलेल्या खाणाखुणांना घेऊन. मग कित्येकदा हातातून मोरपीस सुटून जावं तसं सुटून गेलेल्या गोष्टी घेऊन आपल्या आतलेच आपण अंदाज लढवत राहतो. अन्; मग न उलगडणारी एक कथा पुन्हा अपूर्ण राहून जाते. त्याच खाणाखुणांच्या संगतीने मग मनास शैल्य राहतं अंदाज चुकून गेल्याचं. अन् भरकटलेलं मन मग शोधत राहतं अश्या खाणाखुणांना अंदाज घेत, पुन्हा-पुन्हा अडगळीत असलेल्या दुकानांच्या वाटा जवळ करत. अन्; जुन्या पुस्तकांच्या समवेत हा प्रवास कायम सुरू राहतो, जोवर हे अंदाज जुळत नाही. अन् मग एक कोडं जे कधीतरी सुटणारं वाटत राहतं, ते सुटत नाही. जेव्हा हे सगळं जुळून येतं, तेव्हा या जून्या पुस्तकांच्या आत दड...