मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पाटणादेवी भ्रमंती..!

पाटणादेवी भ्रमंती..! शुक्रवारी "भटका तांडा" समूहाचे प्रमुख "श्रीकांत उमरीकर" सर यांच्या समवेत पाटणादेवी येथे पाटणा भटकंती पूर्व नियोजन बैठकीस जाण्याचा योग आला अन् यामुळे "पाटणादेवी दर्शन" व तिथून जवळच असलेले "हेमाडपंथी महादेव मंदिर" बघण्याचा योगही आला..! पाटणादेवी कुलदैवत असल्यानं नेहमीच जाणे असते परंतु अलीकडे तीन चार वर्ष जाणे झालेले नव्हते.तो योग शुक्रवारी उमरीकर सर यांच्यामुळे जुळून आला.सध्या सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला असल्यामुळे पाटणादेवी सभोवतालचा सर्वच परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. महामार्ग एन.एज. २११ बऱ्यापैकी रुंदीकरण,चौपदरीकरण अन् नव्याने काम झाले असल्यामुळे "औरंगाबाद ते पाटणादेवी" हा जवळ जवळ १०० की.मी अंतराचा प्रवास सव्वा दोन तासात पूर्ण होतो.महामार्गावर तालुक्याच्या शहरांना लागून बायपास झालेला असल्याने वर्दळीचा प्रवास टाळत आपण सलग प्रवास करू शकतो. बऱ्यापैकी झालेला पाऊस त्यामुळे "कन्नड व चाळीसगांव" "मराठवाडा अन् खानदेश" विभागाला जोडणारा "औट्रम घाट" हा पूर्णपणे हिरवाईने नटलेला ...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

स्वप्नांचा पाठलाग अन् खुप काही..!

स्वप्नांचा पाठलाग अन् खुप काही..! मला माणसांच्या सहवासात राहण्याचा कितीही कंटाळा असो परंतु एका त्या स्टेपला गेलो की असं वाटतं की आपण सभोवताली असलेल्या माणसांच्या सहवासात रहायला हवं.कारण निसर्ग खूप देतो आपल्याला त्याच्या सहवासात राहिलं की;पण कुठेतरी एकवेळ अशी येते की माणसांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटू लागतो..! आयुष्यात आलेली असंख्य वळणं अन् त्या वळणावर भेटलेली कित्येक माणसं कोण कसं,कोण कसं,कुणाच्या वागण्यातून कशी वागणूक मिळाली,कुणी कसं मैत्रीच्या पलिकडे जावून माझ्यावर त्यांचा जीव ओवाळून टाकला तर कुणी काय तर कुणी काय..! अनेक वाईट अनुभवसुद्धा येऊन गेले अन् मग साधं काही वेळच्या सहवास,मैत्रीसाठीसुद्धा मी माणसांना पारखून घेऊ लागलो.इतकं सर्व होवूनही माणसांचा सहवास तितकाच हवाहवासा होता..! मी शहरात बऱ्यापैकी जुना असल्यानं कित्येक मित्र झाले,कित्येक सोडून गेले,कित्येकांना मीच वेळीच सोडचिठ्ठी दिली तर कित्येकजण आपणहून माझ्या एकांगी,एकटं राहण्याच्या असलेल्या सवयीमुळे मला सोडून गेले.याचं मलाही कधीच सोयरसुतक नव्हतं,कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशी अनेक माणसं भेटत गेली,जिथं वेळ...

वाभळेवाडी भाग-२

वाभळेवाडी  भाग-२ सांज केव्हाच सरली होती,सूर्य कधीच अस्ताला गेला होता ;अन् आता मावळतीच्या बरोबर एका अंगाला चंद्र आपलं दर्शन वाभळेवाडीच्या लोकांस्नी देऊ लागला होता. नदीच्या थडीला पाण्याचा जोर वाढला होता,नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज,नदी थडीला असलेल्या पिवळ्या बेंडक्यांचा आवाज रामा कुंडूर,जगण्या,तलाठी आण्णा यांच्या बसल्या लिंबाच्या पारा पहूरतक येत होता.नदीच्या अंगाला काळाकुट्ट अंधार माजला होता..! याला भरीस भर की काय म्हणून समशानातील कुत्री त्या काल गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचं आवाजात इवळू लागली होती.नदीच्या दुसऱ्या अंगाला झाडांवर काजवे चमकू लागली होती,व्होलगे मोठ्यानं आवाज करत ओरडू लागली होती,गावच्या जवळ असलेल्या डोंगर रानातून कोल्हे एक सुरात मोठ्यानं कोल्हेकुई हानीत बरतळल्यागत,इवळल्यागत ओरडत होती..! रातीचे दहा कधी सरले अन् सारा गाव बरसदीचे दिस असल्यानं कधी पहुडला हे लिंबाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या रामा कुंडूर,जगण्या अन् नव्यानं शिकावू तलाठी म्हणून आलेल्या संतू आण्णा तलाठी यांना कळलेच नाही..! संतू आण्णा पारावरच आपली कागदप...

कविता काही टिपणे..! - प्रणव सखदेव.

अलीकडे एक सवय लागली आहे की मी गुगलवर कुठलेही एक मराठी वाक्य,पुस्तकाचे नाव,लेखकांचे नाव,ललित लेख,कथा लेखन,असं बरंच काहीतरी टाईप करतो अन् जे काही समोर येते ते वाचत बसतो..! बऱ्यापैकी अभ्यासपूर्ण लेखन इथे वाचनात येते,आज असच ललित लेखन टाईप केलं अन् हा ललित लेख वाचनात आला.गुगलवरती बरच मराठी,उर्दू,इंग्रजी,इत्यादी भाषेतील विविध प्रकारातील साहित्य उपलब्ध आहे फक्त ते शोधण्याची इच्छा असायला हवी..! कविता–काही टिपणे १. रात्र झालेली होती. घरी यायला उशीर झालेला होता. दमलो होतो. आल्या-आल्या थंड पाण्याने अंघोळ केली आणि पलंगावर पाठ टेकली. बाहेर अंधाराकडे डोळे गेले आणि मग छताकडे पाहिले. काही क्षणांत डोळे सरावले; तेव्हा मनात एक ओळ लहरत-ठिबकत-ओघळत-ओघळत पृष्ठभागावर आली – म्हणजे मला निदान सकाळ होईपर्यंत छताकडं तरी बघता येईल निवांतपणे कोलटकरच्या ‘ढग’ कवितेतल्या ही शेवटची ओळ..! सुरुवातच कशी मस्तय, एकदम अनौपचारिक सहजच म्हटल्यासारखं, बोलल्यासारखं. कोलटकरच्या कवितांचं हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या कविता बोलल्यासारख्या, सहज असतात. त्यामुळे त्या ‘कविता’ वाटतच नाहीत. त्यामुळेच त्या कधीकधी सटल व सूचक होतात..! प्रत्ये...

आपण लेखक आहोत पण आपण नेमकं कोणत्या वाटेला जात आहोत..?

आपण लेखक आहोत पण आपण नेमकं कोणत्या वाटेला जात आहोत..? आज आपण सगळी भौतिक सुखे उपभोगत असलो तरी विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपल्याला काहीच पडलेली नाही. ज्यांना सृजनाची देणगी लाभली आहे अशा साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांकडून तरी ही अपेक्षा करणे गैर आहे का? पण तिथेही ‘मला काय त्याचे?’ हीच वृत्ती दिसून येते. आज भोवतालची मळभलेली परिस्थिती पाहता नाशकात या आठवडय़ात भरणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आपल्याला.. स्वतंत्रपणे विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच पडायला हवा. नाही का? कस्तुरीगंध : ‘टाकलेलं पोर’  आक्रमक वकिली युक्तिवाद तो एक श्रेष्ठ कलाकार. भोवतालच्या अन्याय, पिळवणूक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचं बिंब आपल्या कलाविष्कारात उतरवणं हे त्याच्या कलासाधनेचं एक अविभाज्य अंग तो मानतो. म्हणून वर्षांनुवर्ष मधुमेह आणि रक्तदाबाच्या विकारांनी तो ग्रस्त असला तरी शरीराची तमा न बाळगता स्वत:च्या देशातल्या हुकूमशाहीचं, अन्यायाचं चित्रण आपल्या कलाकृतींतून आणि स्फुटलेखनातून तो जगभर पोहोचवतो. त्यामुळे हुकूमशाहीच्या पाईक असलेल्या सर्व यंत्...

Love She He

Love She He ..! सायंकाळचे एक पान डायरीतले विस्कळीत झालेले..! सायंकाळची वेळ अलीकडे फारच व्यस्थतेच्या अन् मनाला मनाशी काही गोष्टींची ठरवून जी खूनगाठ बांधली आहे ती आधिक घट्ट व्हावी म्हणून त्या संबंधी विचार करण्यात निघून जाते. निसर्गाने निर्माण केलेली शिशिराची पानगळ बऱ्याच दिवसांपूर्वी थांबली आहे.परंतु सायंकाळी फिरायला ज्या मैदानावर जातो,तिथं मात्र मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली पानगळ दिसून येते.मग आयुष्याला घेऊन असलेला वाईट भूतकाळ आठवतो..! लवकरच मान्सून वारे पाऊसाला घेऊन आपल्या प्रदेशात येतील अन् मग हा काही क्षणांचा मनात असलेला,आयुष्यात असलेला दुष्काळ संपेल..! असो..! सायंकाळ हल्ली माणसांच्या गर्दीतही शांत-शांत हवी-हवीशी वाटते.अलीकडे १६०० मीटरची प्रॅक्टिस करतांना जीवाची खूपच दमछाक होते.मोजल्या ७ मिनिटात ते पूर्ण होत आहे,पण अजुन आयुष्यात अन् करीयरच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं हे ७ मिनिटांच अंतर वजा कसे होईल यासाठी विचार करत असतो..! ट्रॅकवर पळत असतांना पहिला राऊंड सहज पूर्ण होतो,दुसराही थोडीफार दमछाक करत पूर्ण होवून जातो पण तिसऱ्या राऊंडला मात्र हातपाय जड पडतात,पाय जमिनीव...