मुख्य सामग्रीवर वगळा

Love She He

Love She He ..!

सायंकाळचे एक पान डायरीतले विस्कळीत झालेले..!

सायंकाळची वेळ अलीकडे फारच व्यस्थतेच्या अन् मनाला मनाशी काही गोष्टींची ठरवून जी खूनगाठ बांधली आहे ती आधिक घट्ट व्हावी म्हणून त्या संबंधी विचार करण्यात निघून जाते.

निसर्गाने निर्माण केलेली शिशिराची पानगळ बऱ्याच दिवसांपूर्वी थांबली आहे.परंतु सायंकाळी फिरायला ज्या मैदानावर जातो,तिथं मात्र मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली पानगळ दिसून येते.मग आयुष्याला घेऊन असलेला वाईट भूतकाळ आठवतो..!

लवकरच मान्सून वारे पाऊसाला घेऊन आपल्या प्रदेशात येतील अन् मग हा काही क्षणांचा मनात असलेला,आयुष्यात असलेला दुष्काळ संपेल..!

असो..!
सायंकाळ हल्ली माणसांच्या गर्दीतही शांत-शांत हवी-हवीशी वाटते.अलीकडे १६०० मीटरची प्रॅक्टिस करतांना जीवाची खूपच दमछाक होते.मोजल्या ७ मिनिटात ते पूर्ण होत आहे,पण अजुन आयुष्यात अन् करीयरच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं हे ७ मिनिटांच अंतर वजा कसे होईल यासाठी विचार करत असतो..!

ट्रॅकवर पळत असतांना पहिला राऊंड सहज पूर्ण होतो,दुसराही थोडीफार दमछाक करत पूर्ण होवून जातो पण तिसऱ्या राऊंडला मात्र हातपाय जड पडतात,पाय जमिनीवरून वर व्हायला नकोसे म्हणतात पण आयुष्याला सुख हवं आहे.
म्हणून तो ही राऊंड पूर्ण होवून चौथा राऊंडही पूर्ण केला जातो..!

एरवी चेहऱ्यावरून घाम निथळत असतो,टीशर्ट घामाने चिंब भिजलेला असतो.रात्रंदिवस ही मेहनत असणार आहे,नशिबात असेल तर क्षितिज गवसेल.नाहीतर नकार,पात्र न ठरणे या गोष्टींची शरीराला अन् मनालाही सवय झालीच आहेच.हे सर्व आता इतकं अंगवळणी पडलं आहे की,आता दुःख होत नाही पण पुन्हा तितक्याच ताकदीने उभा राहतो पहिल्यापेक्षा..!

ट्रॅकवर जेव्हा थकवा संपुष्टात येण्यासाठी चालत असतो,तेव्हा जवळपास सगळीच माणसे न्याहाळत असतो.कुणाचं ध्येय काय तर कुणाचं काय,कुणाच्या मनात काय चालू आहे हे इथ खूप सहज कळून जातं.माझ्या मनात काय चालू आहे,याचं गणित मात्र सुटत नाही..!

कालच शहरातील नव्यानं पीएसआय झालेला ज्येष्ठ मित्र भेटला,पहिले तर काय बोलावं कळत नव्हतं. १६०० मीटर मारत असतांना हा विचार मनात चालूच होता,एरवी तो ही थकून पायी चालत राऊंड मारत होता.१२व्या मिनिटाला त्याच्याशी बोलून छान वाटले,मिनिटाभराच्या या बोलण्याने छान वाटले.

आता रोज भेट होत राहील पण या मिनिटाभराच्या भेटीचे अप्रूप त्या रोजच्या भेटीला राहणार नाही.एकीकडे स्वप्न सत्यात उतरले आहे अन् एकीकडे त्यासाठी मेहनत घेणं चालू आहे..!

प्रॅक्टिस झाली अन् सायंकाळचा गार वारा अनुभवत झाडांच्या मध्यस्थी असलेल्या बाकड्यावर बसून काही प्रश्न उत्तरे सोडवत बसलो.सोळाव्या मिनिटाला आठवण आली,ठरल्याप्रमाणे डायरेक्ट कॉल केला. 

माझे दुःख तिचे अन् तिचे दुःख माझे त्यामुळे दोघांत शेअरिंग अन् एकमेकांची काळजी घेणं होतं.दहा मिनिटांच्या बोलण्यानं दोघांना एकमेकांचा आधार वाटतो अन् मग फोन ठेवला जातो पुढे कित्येक दिवस न बोलण्यासाठी..!

त्यामुळं नेहमीच असं वाटत आलं आहे की काही गोष्टी आपल्या सोबत आयुष्यभर असायला हव्या,ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात एक आधार असल्याची जाणीव वेळोवेळी होत असते.आपला परिवार तर नेहमी सोबत असतोच..!

निसर्ग,मित्र,त्याच्या जगण्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल असा मार्गदर्शक अन् नशीब जोरावर असलेच तर आपली दुःख जीला तिची वाटावी अशी मैत्रीण सोबतीला असावी.भविष्यात जेव्हा आपलं पुस्तक येईल तेव्हा पहिली प्रत मी विकत घेईल म्हणणारी मैत्रीण आपल्या स्वतःपेक्षा जास्त ती आपल्याला ओळखत असते हे खरं..!

हे सर्व भेटलं की आयुष्य सुंदर आहे,फक्त या सर्वांना घेऊन वेळेचे गणितं आपल्याला जुळवता आली पाहिजे बस इतकंच..!

Written by,
Bharat Sonwane.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...